मतांची त्सुनामी येणार, फलटणच्या जनतेचं रामराजेंपेक्षा माझ्यावर प्रेम, मोहिते पाटलांबद्दल आदर : रणजितसिंह निंबाळकर
मोहिते पाटलांच्या कुटुंबाबद्दल मला आदर आहे. मी त्यांच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही असे वक्तव्य माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांनी केलं.
Ranjeetsingh Nimbalkar : मोहिते पाटील हे कुटुंब आमच्या पक्षातील मोठे कुटुंब आहे. मला त्यांचा आदर आहे. मी त्यांच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही असे वक्तव्य माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांनी केलं. पक्षाचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांची काळजी घेतील, असंही निंबाळकर म्हणाले. धैर्यशील मोहिते पाटलांना (Dhairyashil Mohite patil) उमेदवारी पाहिजे होती, पण उमेदवारी नाही मिळाली म्हणून, थोडीफार नाराजी असल्याचे निंबाळकर म्हणाले. फलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करते.
त्यामुळं मतांची त्सुनामी येणार असल्याचे निंबाळकर म्हणाले.
साखर कारखान्याच्या विषयासंदर्भासह अनेक विषयांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांना सहकार्य केलं आहे. विधान परिषदेची आमदारकी देखील दिली आहे. मला त्यांचा आदर आहे, मी त्यांच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही असे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले. मला मागच्या वेळेस देखील फलटणमध्ये मतदान कमी पडलं नव्हतं, त्यावेळेस रामराजे नाईक निंबाळकर सभापती होते. फलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावरती अधिक प्रेम करत आहे, त्यामुळं मतांची त्सुनामी येणार असल्याचे रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलं.
सोलापूरची उमेदवारी कोणाला मिळेल हे मला माहिती नाही
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांची भेट घेणार आहेत, याबाबत प्रसारमाध्यमांनी रणजितसिंह निंबाळकरांना विचारलं होतं. यावर मला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले. दरम्यान, सोलापूरची उमेदवारी कोणाला मिळेल हे मला माहिती नाही. अमर साबळे असतील राम सातपुते असतील अनेकांची नावे समोर येत होती. उत्तम जानकर यांचे देखील नाव समोर येत होतं. त्यामुळं उमेदवारी कोणाला मिळेल हे मी सांगू शकत नसल्याचे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले. मात्र, भाजप जो उमेदवार देईल तो तुल्यबळ उमेदवार असणार आहे असं निंबाळकर म्हणाले.
माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीनाट्य
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील कुटुंब नाराज आहे. कारण, भाजपकडून माढा लोकसभा लढवण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना डावलून पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना तिकीट दिलं आहे. त्यामुळं मोहिते पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मोहिते पाटलांनी हाती तुतारी घेऊन शरद पवार गटाकडून माढा लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या: