एक्स्प्लोर

गोव्यात लोकसभेसोबतच विधानसभेची पोटनिवडणूक, 23 एप्रिल रोजी रणधुमाळी

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्ली येथे लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल कुमार यांनी गोव्यातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांची स्वतंत्रपणे माहिती दिली.

पणजी: गोव्यातील लोकसभेच्या 2 जागांसाठी 23 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.या दोन जागांच्या निवडणुकांसोबत मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या विधानसभा पोटनिवडणुका घेतल्या जाणार आहेत. दोन्ही निवडणुकांचा निकाल तब्बल एका महिन्यानंतर 23 मे रोजी लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्ली येथे लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल कुमार यांनी गोव्यातील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांची स्वतंत्रपणे माहिती दिली. गोव्यात लोकसभेच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा 2 जागा आहेत. त्यांच्या निवडणुका 23 एप्रिल रोजी होणार असून त्याच दिवशी म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. म्हापसा, मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदारसंघातील मतदारांसाठी एकाच मतदान केंद्रावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदान करता येणार आहे. तशी व्यवस्था निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघातील मतदारांना एकाच दिवशी दोनवेळा मतदान करावे लागणार आहे. लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच आजपासून देशात आचारसंहिता लागू झाली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.  महाराष्ट्रात   पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) रोजी 48 पैकी 07 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान होणार आहे.  तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान होणार आहे तर चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान होणार आहे. कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान पहिला टप्पा 07 जागांवर मतदान (11 एप्रिल) वर्धा रामटेक नागपूर भंडारा-गोंदिया गडचिरोली-चिमुर चंद्रपूर यवतमाळ-वाशिम दुसरा टप्पा (18 एप्रिल) 10 जागांवर मतदान बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर सोलापूर तिसरा टप्पा (23 एप्रिल)   14 जागांवर मतदान जळगाव रावेर जालना औरंगाबाद रायगड पुणे बारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकनंगले चौथ्या टप्पा (29 एप्रिल) 17 जागांवर मतदान नंदुरबार धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर-पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मावळ शिरुर शिर्डी ================================ राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. संपूर्ण देशाचं लक्ष निवडणुकांच्या तारखांकडे लागून राहिलं होतं. सोळाव्या लोकसभेची मुदत 3 जून 2019 रोजी संपते. देशात लोकसभेच्या 543 जागा आहेत. पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्यं दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्यं तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्यं चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्यं पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्यं सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्यं सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्यं मतमोजणी : 23 मे 2019 लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या तारखा पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात मतदान पहिला टप्पा - 11 एप्रिल - आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, निकोबार दुसरा टप्पा - 18 एप्रिल - आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी, तिसरा टप्पा - 23 एप्रिल - आसाम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओदिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली, दमण दीव चौथा टप्पा - 29 एप्रिल - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल पाचवा टप्पा - 6 मे - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल सहावा टप्पा - 12 मे - बिहार, आसाम, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल सातवा टप्पा -  19 मे - बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, चंदिगढ, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रत्येक टप्प्यात किती जागांवर मतदान (राज्यानुसार आकडेवारी) पहिला टप्पा - (91) आंध्र प्रदेश - 24 अरुणाचल प्रदेश - 2 आसाम - 5 बिहार - 4 छत्तीसगढ - 1 जम्मू काश्मिर - 2 महाराष्ट्र - 7 मणिपूर-1 मेघालय - 2 मिझोराम - 2 नागालँड-1 ओदिशा - 4 सिक्कीम - 1 तेलंगणा- 17 त्रिपुरा- 1 उत्तर प्रदेश - 8 उत्तराखंड - 5 पश्चिम बंगाल - 2 अंदमान निकोबार - 1 लक्षद्वीप - 1 दुसरा टप्पा - (97) आसाम - 5 बिहार - 5 छत्तीसगड - 3 जम्मू काश्मिर - 2 कर्नाटक - 14 महाराष्ट्र - 10 मणिपूर - 1 ओदिशा - 5 तामिळनाडू - 39 (सर्व) त्रिपुरा - 1 उत्तर प्रदेश - 8 पश्चिम बंगाल - 3 पुदुच्चेरी - 1 तिसरा टप्पा - (115) आसाम - 4 बिहार - 5 छत्तीसगड - 7 गुजरात - 26 गोवा - 2 जम्मू काश्मिर - 1 कर्नाटक- 14 केरळ - 20 महाराष्ट्र - 14 ओदिशा - 6 उत्तर प्रदेश- 10 पश्चिम बंगाल - 5 दादरा नगर  - 1 दमण - दीव - 1 चौथा टप्पा (71) बिहार - 5 जम्मू काश्मिर - 1 झारखंड - 3 मध्य प्रदेश - 6 महाराष्ट्र - 17 ओदिशा - 6 राजस्थान - 13 उत्तर प्रदेश - 13 वेस्ट बंगाल - 8 पाचवा टप्पा (51) बिहार - 5 जम्मू काश्मिर - 2 झारखंड - 4 मध्य प्रदेश - 7 राजस्थान - 12 उत्तर प्रदेश - 14 पश्चिम बंगाल - 7 सहावा टप्पा (59) बिहार 8 हरियाणा 10 झारखंड - 4 मध्य प्रदेश - 8 उत्तर प्रदेश - 14 पश्चिम बंगाल - 8 दिल्ली - 7 सातवा टप्पा (59) बिहार - 8 झारखंड - 3 मध्य प्रदेश - 8 पंजाब -  13 पश्चिम बंगाल - 9 चंदिगढ - 1 उत्तर प्रदेश - 13 हिमाचल प्रदेश- 4 निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे  LIVE UPDATE - चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान - तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान - दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान - पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान - महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार - बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी सात टप्प्यांमध्ये मतदान - आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान, दादरा नगर हवेली, दमन आणि द्वीप, लक्षद्वीप, दिल्ली, पुदुच्चेरी, चंदिगढ़ या राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्यं दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्यं तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्यं चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्यं पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्यं सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्यं सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्यं मतमोजणी : 23 मे 2019 - 23 मे 2019 रोजी मतमोजणी आणि निकालाची घोषणा संबंधित बातम्या लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी ईव्हीएमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे महत्त्वपूर्ण निर्णय
लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी
लोकसभा निवडणूक 2014 : देशभरातील पक्षीय बलाबल

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget