उस्मानाबादमधील शिवसेना-राष्ट्रवादी समर्थकांमध्ये कोण जिंकणार यावर पैज, हरल्यावर बाईक देणार
मतदान झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये माझा उमेदवार निवडून येणार की तुझा उमेदवार निवडून येणार चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर दोघांनी पैज लावत आपल्या गाड्या दाव्याला लावल्या आहेत.
मुंबई : सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सर्वत्र निवडणुकीच्याच चर्चा असल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीत कोण जिंकणार यावर मोठ्या प्रमाणावर सट्टाही लावला जातो, त्यावर पोलीसांचं लक्ष आहे. मात्र निवडणुकीत कोण जिंकणार याबाबत स्टॅम्प पेपरवर लिहून देत पैज लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
उस्मानाबादमध्ये लोकसभा निवणुकीत कोण निवडून येणार यासाठी शिवसेना समर्थक बाजीराव करवर आणि राष्ट्रवादीचा समर्थक शंकर मोरेमध्ये पैज लागली आहे. जर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला तर माझी टू व्हीलर गाडी मी बाजीराव करवरला देणार, असं शंकर मोरेने स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला तर मी माझी गाडी शंकर मोरेला देऊन टाकणार असं बाजीराव करवरने लिहून दिलं आहे.
VIDEO | मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं फेसबुक लाईव्ह, गुन्हा नोंदवण्याचे पोलिसांना आदेश | उस्मानाबाद | एबीपी माझाउस्मानाबादमधील राष्ट्रवादी-शिवसेना समर्थकांमधील पैज सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मतदान झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये माझा उमेदवार निवडून येणार की तुझा उमेदवार निवडून येणार चर्चा सुरू होती.
या चर्चेनंतर दोघांनी पैज लावत आपल्या गाड्या दाव्याला लावल्या आहेत. त्यामुळे 23 मे रोजी निवडणूक निकालानंतर कोणाच्या समर्थकाला गाडी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.