एक्स्प्लोर
Loksabha Election 2019 : निवडणूक प्रचार संपताच 'नमो टीव्ही'ही बंद
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचार अभियानाचं माध्यम म्हणून 'नमो टीव्ही' चॅनल सुरु करण्यात आलं होतं.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा आणि निवडणूक संदेशांचा प्रचार करणारं भाजपचं चॅनल 'नमो टीव्ही' बंद झाला आहे. 17 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्यानंतर हे चॅनल बंद झालं.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचार अभियानाचं माध्यम म्हणून 'नमो टीव्ही' चॅनल सुरु करण्यात आलं होतं. प्रचार संपल्यासोबतच आता या चॅनलची आवश्यकता नाही. त्यामुळे 17 मे रोजी निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर चॅनलही बंद केलं, असं भाजपच्या एका नेत्याने सांगितलं.
'नमो टीव्ही' चॅनल सुरु झाल्यापासून वाद झाला होता. निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यानंतरही 'नमो टीव्ही'वर निवडणुकीसंदर्भातील बातम्या प्रसारित केल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस पाठवली होती. मात्र आम्ही निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन नाही, असं उत्तर भाजपने दिलं होतं.
निवडणूक आयोगाने एप्रिलमध्ये निर्देश दिले होते की, नमो टीव्हीवर प्रसारित होणारे सर्व रेकॉर्डेड कार्यक्रम पूर्व प्रमाणित असावेत. तसंच परवानगीशिवाय 'नमो टीव्ही'वर कोणतेही कार्यक्रम प्रसारित करु नये, असंही सांगितलं होतं.
आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी 'नमो टीव्ही'वर बंदी घालण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला द्यावे, अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने नोटीस पाठवून 'नमो टीव्ही' संदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून अहवाल मागितला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement