एक्स्प्लोर

मतदारांच्या बोटांना लावलेली शाई कर्मचाऱ्याला महागात, काळजी घेण्याचं डॉक्टरांचं आवाहन

परभणी लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान झाले. 6 विधानसभा क्षेत्रातील 2174 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. यावेळी जिंतूर तालुक्यातील बलसा मतदार केंद्र सहाय्यक केंद्र प्रमुख म्हणून दत्तराव राऊत यांची नियुक्ती करण्यात आली होती.

परभणी : निवडणुकीत मतदारांच्या बोटाला शाई लावणं एका कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. दिवसभर मतदान केंद्रात शाई लावल्यानंतर रात्री या कर्मचाऱ्याच्या तीन बोटांची आग होऊ लागली. नंतर ते तात्काळ दवाखान्यात गेले, मात्र काहीच फरक न पडल्याने त्यांना परभणीत तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार सुरु करावा लागला. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी शाई लावताना काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान झाले. 6 विधानसभा क्षेत्रातील 2174 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. यावेळी जिंतूर तालुक्यातील बलसा मतदार केंद्र सहाय्यक केंद्र प्रमुख म्हणून दत्तराव राऊत यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान करण्यापूर्वी प्रत्येकाच्या बोटाला शाई लावण्याचे काम त्यांच्याकडे होतं. त्यानुसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी हे काम प्रामाणिकपणे पार पाडले. मात्र हे काम करत असताना बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईचे ओघळ त्यांच्या बोटांवर येत होते. त्यामुळे उजव्या हाताची तिन्ही बोटं त्या शाईने रंगून गेली होती. काम करत असताना त्यांना लक्षात आले नाही, परंतु रात्री घरी गेल्यावर त्यांचे बोटं दुखू लागली. जिंतूरच्या स्थानिक डॉक्टरांना हा प्रकार दाखवला, त्यांनी तात्पुरते औषधे दिली परंतु त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे त्यांनी परभणीतील त्वचारोग तज्ञ डॉ. जोगड यांना हा प्रकार दाखवला. जोगड यांनी शाईमधील केमिकलमुळे हा प्रकार घडला असून, थोड्या दिवसात त्रास कमी होईल, असं सांगितल्यानंतरच दत्तराव राऊत यांचं समाधान झालं. मागच्या पाच दिवसांपासून शाईच्या प्रादुर्भावामुळे हैराण झालेल्या राऊत यांना सध्या तरी बरं वाटत आहे. मात्र मतदान केंद्रांमध्ये मतदारांना शाई लावणाऱ्या इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी, या प्रकारानंतर काळजी घेणं गरजेचं बनलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget