एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट

लोकसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यात चार विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आलेली आहेत. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी पालकमंत्री गिरिश बापट यांना तिकिट देण्यात आलं आहे.

मुंबई : लोकसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यात चार विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आलेली आहेत. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी पालकमंत्री गिरिश बापट यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर सोलापूरसाठी अनेक पर्यायांची चाचपणी झाल्यानंतर जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. WATCH VIDEO | भाजपची दुसरी यादी जाहीर, पुण्यातून गिरीश बापट तर बारामतीत कांचन कुल यांना उमेदवारी | एबीपी माझा Loksabha Election 2019 : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट Loksabha Election 2019 : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट तिकिटं कापण्यात आलेल्या विद्यमान खासदारांमध्ये पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील, दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. दरम्यान जळगावमध्ये एकनाथ खडसेंऐवजी गिरीश महाजन यांच्या गटाच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तसेच बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर दिंडोरीमधून चव्हाणांच्या जागी डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे दुसऱ्या यादीतील उमेदवार पुणे - गिरीश बापट दिंडोरी - डॉ. भारती पवार जळगाव - स्मिता वाघ सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी बारामती - कांचन कुल भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा दरम्यान, भाजपची पहिली  उमेदवार यादी 21 मार्च रोजी घोषित झाली होती.  लोकसभा निवडणुकीसाठी देशात भाजपच्या 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा केली होती. ज्यात 14 विद्यमान खासदारांना  पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्रात 25 जागा लढवणार आहे. भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. लातूरमध्ये सुधाकरराव शृंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुधाकर शृंगारे हे लातूरच्या वडवळ-नागनाथ गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. सुधाकर शृंगारे बौद्ध समाजाचे असून व्यवसायाने बिल्डर आहेत. शिवाय ते पैशांनी प्रबळ उमेदवार असल्याचं कळतं. तर सुजय विखे पाटील नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते पुत्र आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार
  1. नंदुरबार - हीना गावित
  2. धुळे -  सुभाष भामरे
  3. रावेर- रक्षा खडसे
  4. अकोला - संजय धोत्रे
  5. वर्धा - रामदास तडस
  6. नागपूर - नितीन गडकरी
  7. गडचिरोली-चिमुर - अशोक नेते
  8. चंद्रपूर- हंसराज अहिर
  9. जालना - रावसाहेब दानवे
  10.  भिवंडी - कपिल पाटील
  11. मुंबई उत्तर - गोपाळ शेट्टी
  12. मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन
  13. अहमदनगर - सुजय विखे पाटील
  14. बीड - डॉ. प्रीतम मुंडे
  15. लातूर - सुधाकरराव शृंगारे
  16. सांगली - संजयकाका पाटील
  17. पुणे - गिरीश बापट
  18. दिंडोरी - डॉ. भारती पवार
  19. जळगाव - स्मिता वाघ
  20. सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी
  21. बारामती - कांचन कुल
भाजप मुंबईतील सहापैकी तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र किरीट सोमय्या खासदार असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघ वगळता इतर जागांवरील उमेदवारांची घोषणा झाल आहे. शिवसेनेकडून सोमय्यांच्या नावाला विरोध असल्यामुळे सोमय्यांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी हे वाराणसीतून, गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौमधून तर भाजपाध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. देशभरातील महत्त्वाचे उमेदवार वाराणसी - नरेंद्र मोदी लखनौ - राजनाथ सिंह नागपूर - नितीन गडकरी गांधीनगर - अमित शाह बागपत - डॉ सत्यपाल सिंह गाजियाबाद - वीके सिंह गौतम बुद्ध नगर - महेश शर्मा मथुरा- हेमा मालिनी अमेठी - स्मृती इरानी उत्तर कन्नड - अनंत कुमार हेगडे उन्नाव - साक्षी महाराज अरुणाचल पूर्व - किरेन रीजीजू आसनसोल- बाबुल सुप्रियो संबंधित बातम्या लोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा
लोकसभा निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा
काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
Uddhav Thackeray Vs Shah सत्ताधारी, विरोधकांची एकमेकांवर आरोपाची चिखलफेक, डायलॉगबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
Embed widget