Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 : अहमदनगरमध्ये काटे की टक्कर, आठव्या फेरीत निलेश लंकेंची आघाडी, विखे पाटील पिछाडीवर
Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आठव्या फेरीत निलेश लंकेंनी आघाडी घेतली असून सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत.
Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि महायुतीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात काटे की टक्कर होत आहे.
अहमदनगरमधून निलेश लंके आघाडीवर
भाजपचे सुजय विखे हे काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. मात्र आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी आघाडी घेतली आहे. आठव्या फेरी अखेर सुजय विखे यांना 2 लाख 2 हजार 710 मते पडली असून निलेश लंके यांना 2 लाख 7 हजार 518 मते मिळाली आहेत. आता निलेश लंके यांना 4, हजार 808 मतांनी आघाडी घेतली आहे.
दोन लाखांच्या मताधिक्याने जिंकणार : निलेश लंके
दरम्यान, काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी अहमदनगर लोकसभेतून दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार, असा दावा केला होता. निलेश लंके यांनी म्हटले होते की, मला 100 टक्के विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली तेव्हा मी जाहीर केले होते की मी दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार आहे, असे त्यांनी म्हटले होते.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना एकूण 1 लाख 90 हजार 835 मते मिळाली आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरेंना एकूण 2 लाख 10 हजार 300 मते मिळाली आहेत. सातव्या फेरीअखेर भाऊसाहेब वाकचौरे हे 19 हाजर 465 मतांनी आघाडीवर आहे. तर वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना नऊ फेऱ्यात एकूण 43, हजार 834 मते मिळाली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Video: उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी, 'जलमंदिर' गहिवरलं; पत्नीची मिठी अन् कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष