कर्नाटकमध्ये लोकसभेचा धक्कादायक निकाल! पाच वर्षांत सगळं बदललं; भाजपला मोठा फटका!
Karnataka Lok Sabha Election Result 2024 : भाजपला महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसला आहे. या दोन महत्त्वाच्या राज्यांसह कर्नाटकमध्येही भाजपची पिछेहाट झाली आहे.
बंगळुरू : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सध्या मतमोजणी चालू आहे. या निवडणुकीत भाजपला (BJP) चांगलाच धक्का बसतोय. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यासारख्या महत्त्वाच्या राज्यांत भाजपच्या अनेक जागा कमी होताना दिसत आहेत. असे असतानाच आता कर्नाटक (Karnataka Lok Sabha Election) राज्याचाही निकाल हळूहळू स्पष्ट होत आहे. येथे भाजप सर्वाधिक जागा जिंकताना दिसतंय.
कर्नाटकमध्येही भाजपला फटका
एकूण 28 जागांपैकी 16 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर 10 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत. म्हणजेच ज्या पद्धतीने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यात फटका बसला होता, तसाच फटका भाजपला कर्नाटकमध्येही बसला आहे. येथे कर्नाटकच्या जागा कमी होताना दिसत आहे.
2019 साली नेमकं काय घडलं होतं?
2019 सालच्या तुलनेत काँग्रेसने कर्नाटकमध्ये यावेळी चांगली कामगिरी केली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने 28 जागांपैकी तब्बल 25 जागांवर विजय मिळवला होता. या आधीच्या निवडणुकीत भाजपने कर्नाटकवर एकहाती वर्चस्व गाजवले होते. 2019 साली काँग्रेसला येथे फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता. धर्मनिरपेक्ष जनता दल आणि अपक्ष उमेदवाराचा प्रत्येकी एका जागेवर विजय झाला होता.
प्रज्वल रेवण्णाचा पराभव
भाजपने यावेळी कर्नाटक राज्यात प्रज्वल रेवण्णा यांना तिकीट दिले होते. ऐन प्रचाराच्या काळातच रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर ते परदेशात गेले होते. कर्नाटकची निवडणूक संपताच ते भारतात परतले होते. याच रेवण्णा यांना कर्नाटकच्या जनतेने इंगा दाखवला आहे. रेवण्णा यांचा तब्बल 40 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे. त्यांना काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पटेल यांनी पराभूत केले आहे. अद्याप संपूर्ण निकाल हाती आलेला नसला तरी पटेल यांना आतापर्यंत 667861 मते पडली आहेत. तर रेवण्णा यांना 624142 मते पडली आहेत. रेवण्णा 43719 मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत. मतांचा हा फरक संपुष्टात येण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रेवण्णा हे येथून जवळपास पराभूत झाले आहेत.
हेही वाचा :
जनतेनं दाखवला इंगा, पराभूत झाला आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा; कर्नाटकात काँग्रेस उमेदवाराने मारली बाजी