एक्स्प्लोर

दिंडोरी लोकसभेतून मिळवली तब्बल 1 लाख मतं, मविआची डोकेदुखी वाढवणारे डुप्लिकेट 'भगरे सर' अचानक गायब?

Dindori Lok Sabha Election Result 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात बाबू सदू भगरे यांची जोरदार चर्चा रंगली. कारण बाबू सदू भगरे यांनी एक लाखांहून अधिक मते मिळवली.

Dindori Lok Sabha Election Result 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी पराभव केला. मात्र दिंडोरीच्या मतमोजणी दरम्यान भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेले उमेदवार बाबू सदू भगरे (Babu Bhagare) यांची जोरदार चर्चा रंगली. कारण बाबू सदू भगरे यांनी तब्बल 1 लाख 03 हजार 632 मतं मिळवली. 

दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने सर आहेत. तर बाबू भगरे यांच्या नावापुढे सर असे लावण्यात आल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता दिंडोरीतील अपक्ष उमेदवार बाबू भगरे हे अचानक गायब झाल्याचे समजते. भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांचे चिन्हात देखील साधर्म्य असल्याचे दिसून आले. भास्कर भगरे यांचे तुतारी वाजविणारा माणूस तर बाबू भगरे यांचे तुतारी असे चिन्ह होते. 

दिंडोरीतून एक लाख मतं मिळवणारे बाबू भगरे नेमके कोण?  

बाबू भगरे हे तिसरी पास असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमधील एकलहरे येथील ते रहिवासी आहेत. बाबू भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करतात. तरीही नावापुढे सर म्हणून उल्लेख होता.  बाबू भगरे यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. मात्र लाखभर मतं मिळाल्याने बाबू भगरे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून बाबू भगरे निवडणुकीला उभे होते याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांना देखील माहिती नसल्याचे समोर येत आहे. 

विधानसभा निहाय झालेले मतदान

नांदगाव विधानसभा (सुहास कांदे- शिंदे गट)

- भास्कर भगरे - 61336

- डॉ.भारती पवार- 103001*

- बाबु सदू भगरे सर - 12288

कळवण विधानसभा (नितीन पवार - अजित पवार गट)

- भास्कर भगरे -114134*

- डॉ.भारती पवार-56461

- बाबु सदू भगरे सर- 20843

चांदवड विधानसभा ( राहुल आहेर- भाजप)

- भास्कर भगरे -78578

- डॉ.भारती पवार-95325*

- बाबु सदू भगरे सर- 12509

येवला विधानसभा (छगन भुजबळ- अजित पवार गट)

- भास्कर भगरे -93500*

- डॉ. भारती पवार-80295

- बाबु सदू भगरे सर-16039

निफाड विधानसभा (दिलीप बनकर अजित पवार गट)

- भास्कर भगरे - 89554*

- डॉ.भारती पवार- 71370

- बाबु सदू भगरे सर-14414

पेठ-दिंडोरी विधानसभा.( नरहरी झिरवाळ- अजित पवार गट)

- भास्कर भगरे- 138189*

- डॉ. भारती पवार - 55881

- बाबु सदू भगरे सर-27442

एकूण झालेले मतदान - 1241985

- ग्राह्य मतदान - 1232664

- बाद मतदान- 1075

- नोटा - 8246

एकूण पोस्टल मतदान- 5310

ग्राह्य मतदान- 4195*

बाद मते- 1075

भास्कर भगरे - 2048

डॉ. भारती पवार- 1807

बाबु सदू भगरे सर- 106 

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294

इंडिया आघाडी- 232

इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 29

महायुती- 18

अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9

शिवसेना (शिंदे गट)-7

राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13

ठाकरे गट-9

शरद पवार गट-8

आणखी वाचा 

उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा धुव्वा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांसह 6 विद्यमान खासदारांना घरचा रस्ता, पराभवाची कारणे काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics | 11 कोटींच बक्षीस, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर 'बोलंदाजी'Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोलPune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न,  पुण्यात वर्दीवरच हल्ला, सामान्याचं काय?ABP Majha Headlines 11 PM एबीपी माझा हेडलाईन्स 11 PM 06 July 2024 Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
Embed widget