अमरावतीतून नवनीत राणा पराभूत, ठाकरेंच्या शिवसेनेकडून हनुमान चालिसा पठणाचं आयोजन!
Lok Sabha ELection Result : लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. दुसरीकडे याच जागेवरून काँग्रेसचे नेते बळवंत वानखेड यांचा विजय झाला आहे.
अमरावती : अमरावती या मतदारसंघातून भाजपच्या (BJP) तिकिटावर निवडणूक लढवलेल्या नवणीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव झाला आहे. येथे मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पारड्या मतं टाकली आहेत. दरम्यान, लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) जाहीर होण्याआधी नवणीत राणा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होत्या. उद्धव ठाकरे (Uddhav Thacekeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसाचे पाठण केले होते, तेव्हापासून त्या विशेष रुपाने चर्चेत होत्या. दरम्यान, आता निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठणाचं आयोजन केलं आहे.
उद्या सकाळी 10 वाजता हुनमान चालिसा पठण
नवनीत राणा पराभूत झाल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून उद्या सकाळी 10 वाजता हनुमान अमरावती शहराला लागून असलेल्या जागृत चांगापूर हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. अमरावती महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी हनुमान चालिसा पठणाचं आयोजन केलं आहे.
थेट मुंबईत जाऊन हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न
नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्या थेट मुंबईत गेल्या होत्या. पण पोलीसांनी त्यांना अटक केली होती. नंतर हे प्रकरण बरंच गाजलं. राणा यांच्याविरोधात तेव्हा गुन्हादेखील दाखल झाला होता. आता याच नवनीत राणा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत.
अमरावती लोकसभेचा निकाल काय आला?
अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला. त्यांना एकूण 5 लाख 26 हजार 271 मतं मिळाली. दुसरीकडे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना 5 लाख 65 हजार 40 मते मिळाली आहेत. राणा यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव झाला आहे. महायुतीचा भाग असलेल्या प्रहार जनशक्ती या पक्षानेही अमावतीतून उमेदवार दिला होता. त्यांच्या बळवंत बुब या उमेदवाराला 85 हजार 300 मते मिळाली आहेत. म्हणजेच प्रहार जनशक्तीच्या उमेदवारामुळे राणा यांना मिळणारी मतं फुटली आहेत.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
---------------------
एकूण- 17
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
-----------------
एकूण- 30
हेही वाचा :
Sharad Pawar: नितीश कुमारांना पंतप्रधानपदाच्या ऑफरची चर्चा, शरद पवार सत्तास्थापनेबाबत काय म्हणाले?