एक्स्प्लोर

लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात, राज्यात सात जागांसाठी मतदान

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, रामटेक आणि वर्धा या सात मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. 2014 साली या सातही जागा युतीने जिंकल्या होत्या.

मुंबई : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. देशातल्या 91 मतदारसंघात मतदान होणार असून, त्यात विदर्भातल्या सात मतदारसंघाचा समावेश आहे. नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, रामटेक आणि वर्धा या सात ठिकाणी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ईव्हीएम आणि इतर निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. यंदा सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचं सावट गडचिरोलीमधल्या निवडणुकांवरही आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त आणि संवेदनशील मतदारसंघात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय हंसराज अहिर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार सुरेश धानोरकर इत्यादी दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद होणार आहे. यंदाची निवडणूकही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच रंगणार आहे. दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या आहेत. विदर्भासह देशभरातील जनतेचा कौल कोणाला याचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. विदर्भातील सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती? नागपूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूरात 57.12 टक्के मतदान झालं होतं. 19 लाख मतदारांपैकी 10 लाख 85 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता. भाजपच्या नितीन गडकरींना 5 लाख 87 हजार 767 मतं मिळाली होती. काँग्रेसच्या विलास मुत्तेमवारांना 3 लाख मतं मिळाली होती. गडकरी तब्बल 2 लाख 85 हजार मतांनी विजयी झाले होते. भंडारा-गोंदिया : भंडारा-गोंदियात तब्बल 72.31 टक्के मतदान झालं होतं. 16.50 लाख मतदारांपैकी 11 लाख 97 हजार 398 मतदारांनी मतदान केलं. त्यावेळी भाजपकडून लढणाऱ्या नाना पटोलेंनी राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांना दीड लाख मतांनी हरवलं होतं. पटोलेंना 6 लाख 6 हजार मतं मिळाली होती तर प्रफुल पटेलांना 4 लाख 56 हजार मतं मिळाली होती. गडचिरोली-चिमूर : या मतदारसंघात 14 लाख 68 हजार मतदारांपैकी 70.04 टक्के म्हणजेचे 10 लाख 28 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपचे अशोक नेते यांनी काँगेसच्या नामदेव उसेंडी यांचा 2 लाख 35 हजार मतांनी हरवलं होतं. चंद्रपूर : मतदारसंघात 63.29 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 53 हजारांपैकी 11 लाख मतदारांनी मतदानाचा हक्कं बजावला होता. भाजपचे हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळे यांचा 2 लाख 36 हजार मतांनी पराभव केला होता. यवतमाळ-वाशिम : 58.87 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 55 हजार मतदारांपैकी 10 लाख 33 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा 1 लाख 7 हजार मतांनी पराभव केला होता. रामटेक : या मतदारसंघात 62.64 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 77 हजार मतदारांपैकी 10 लाख 50 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. शिवसेनेचे कृपाल तुमाने 1 लाख 75 मतांनी विजयी झाले होते. त्यांना 5 लाख 19 हजार तर काँगेसच्या मुकुल वासनिक यांना 3 लाख 44 हजार मतं मिळाली होती. वर्धा : या मतदार संघात 64.79 टक्के मतदान झालं होतं. 15 लाख 64 हजार मतदारांपैकी 10 लाख 13 हजार मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपच्या रामदास तडस यांना 5 लाख 37 हजार मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या सागर मेघेंना 3 लाख 21 हजार मतं मिळाली होती. तडस 2 लाख 15 हजार मतांनी जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget