एक्स्प्लोर
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा, युवकांना नोकरी तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचं आश्वासन
नवीन सरकार आल्यानंतर तिहेरी तलाकचा अध्यादेश रद्द करणार असल्य़ाचेही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे.
मुंबई : आगामी लोकसभा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात शेतकरी, महिला आणि युवक यांच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमुक्तीची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.
भाजपने अल्पसंख्याकांशी चर्चा न करता तिहेरी तलाकचा अध्यादेश आणला, मात्र राज्यसभेत याचे कायद्याचे रुपांतर होऊ शकले नाही. पण नवीन सरकार आल्यानंतर तिहेरी तलाकचा अध्यादेश रद्द करणार असल्य़ाचेही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे.
VIDEO | जेव्हा शरद पवार स्वत: उदयनराजेंची कॉलर उडवतात... | कराड | एबीपी माझा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील मुद्दे
- शेतकरी, महिला आणि युवकांवर भर
- नोटबंदीनंतर किती नोकऱ्या गेल्या त्यांची श्वेतपत्रिका काढणार
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती
- शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी पीपीपी मॉडेलला प्रोत्साहन देणार
- शेतमजुरांना नरेगा योजनेतून मदत मिळणार
- शेतीला लागणाऱ्या वस्तू जीएसटीतून मुक्त करणार
- शहरातील पदवीधरांना 100 दिवसांची नोकरीची हमी
- मुलींना शिशुवर्गापासून पदव्युत्तरपर्यंत शिक्षण मोफत देणार
- नवीन सरकार आल्यानंतर तिहेरी तलाकचा अध्यादेश रद्द करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement