एक्स्प्लोर

Latur Lok Sabha Result 2024 Live : लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे यांचा बहुमताने विजय....

Latur Lok Sabha Result 2024 Live : लातूर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील 41 व्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. या ठिकाणचे मतदार हे राजकीयदृष्ट्या जागरूक असल्याचं दिसतंय.

Latur Lok Sabha Result 2024 Live : लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. भाजपाने दोन वेळेस इथे प्रचंड मताधिकाने विजय मिळवला होता. यावेळेस हॅट्रिक करण्यासाठी भाजपाने सर्व प्रयत्न केले. मात्र मतदारांनी कौल डॉक्टरच्या बाजूने दिला. डॉक्टर शिवाजीराव काळगे (Shivajirao Kalge) यांना सहा लाख नऊ हजार एकवीस मते मिळवण्यात यश आला आहे. तर निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुधाकर शृंगारे यांना पाच लाख 47 हजार 140 मते पडली. डॉक्टर शिवाजी गाडगे यांनी 61,881 मताची भरघोस आघाडी मिळवून यश संपादन केलं.

मतदारसंघ निहाय लीड

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून 29 हजार 924 मतांची लीड काँग्रेसला मिळाली आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघ 17,195 मतांची लीड काँग्रेसला मिळाली आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून 3495 मतांची लीड भाजपला मिळाली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातून 4796 मताची लीड भाजपाला मिळाली आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातून 20217 मताची लीड काँग्रेस मिळाली आहे. आणि लोहा विधानसभा मतदारसंघातून 8488 मताची ही काँग्रेसला मिळाली आहे. पोस्टल मतदाना 318 मताची लीड काँग्रेसला मिळाली आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील 41 व्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. या ठिकाणचे मतदार हे राजकीयदृष्ट्या जागरूक असल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील लातूरकरांनी भरघोस मतदान केलं. गेल्या वेळेस या मतदानात आणि या वेळेस जास्त अंतर नाही. 2019 मध्ये लातूर जिल्ह्यात 62.44% मतदान झालं तर 2024 मध्ये जिल्ह्यात 62.59 टक्के मतदान झालं आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. लातूर जिल्ह्यातील पाच आणि नांदेड जिल्ह्यातील एका मतदारसंघाचा यात समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर शहर लातूर ग्रामीण निलंगा उदगीर आणि अहमदपूर तर नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? 

एकूण मतदान - 62.59%
लातूर ग्रामीण...65.28%
लातूर शहर....60.77%
अहमदपूर...63.12%
उदगीर....63.31%
निलंगा ....62.02%
लोहा.....61.24%

लातूर लोकसभा मतदारसंघातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

लातूर शहर ....अमित देशमुख काँग्रेस 
लातूर ग्रामीण ...धीरज देशमुख काँग्रेस 
निलंगा संभाजी पाटील निलंगेकर ...भाजप
उदगीर संजय बनसोडे ...राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 
अहमदपूर बाबासाहेब पाटील... राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
लोहा विधानसभा मतदारसंघ... शामसुंदर शिंदे शेतकरी कामगार पक्ष

2019 सालचा निवडणूक निकाल 

भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे... सहा लाख 61 हजार 495 
काँग्रेस उमेदवार मच्छिंद्र कामत... तीन लाख 72 हजार 384 
वंचित बहुजन आघाडी उमेदवार रामराव गारकर.... एक लाख 12 हजार 255
भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे विजयी

निवडणूक स्थानिक विषयावर...

मागील दोन निवडणुकीत भाजपाला एक हाती विजय मिळाला त्याचं मुख्य कारण मोदी फॅक्टर हे होतं. यावेळेस काँग्रेसने डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या रूपाने फ्रेश चेहरा दिला आहे. भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या बद्दल असलेले नाराजी हाच मुद्दा निवडणुकीत महत्वपूर्ण पद्धतीने वापरला. संपूर्ण देशमुख परिवार निवडणुकीत सक्रिय होतं. घटक पक्षाची पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सहभागी करून घेण्यात काँग्रेसला यश आलं. त्याच वेळेस भाजपामध्ये अंतर्गत वाद वाढत होते. मराठा आरक्षणाचा विषय शेतमालाचा पडलेला भाव.. शेतमालाला न मिळणारा हमीभाव ..पिण्याचा पाण्याचा प्रश्न.. खताचे वाढलेले भाव आणि बेरोजगारी याच मुद्द्यावर काँग्रेसने जास्त भर दिला. रेल्वे बोगी कारखाना असेल रस्त्याचे रुंदीकरण यांसारख्या इतर कामाला भाजपाला प्रमोट करता आलं नाही. ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपातल्या उमेदवारांची जशी होती तशीच ती आमदार अमित देशमुख विरुद्ध आमदार संभाजी पाटील निलंगेकर अशी ही लढली गेली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सभांचा आणि यंत्रणेंचा धडका लावला गेला होता.

मराठा मुस्लिम आणि लिंगायत मत निर्णायक...

अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. यावेळेस काँग्रेसने लिंगायत समाजातून येणाऱ्या डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली आणि चुरस निर्माण झाली. भाजपने विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांना संधी दिली. मराठा आरक्षणाच्या विषयामुळे नाराज असलेला मराठा समाज भाजपापासून दुरावला. मुस्लिम समाज काँग्रेसकडे एकटला भाजपाकडे चुकलेला लिंगायत समाज या वेळेस मात्र डॉक्टर शिवाजीराव काळगेंमुळे आपल्याकडे खेचून घेण्यात काँग्रेसला यश आले का? ओबीसीच्या प्राबल्यामुळे भाजपाचा गड बनलेला लातूर लोकसभा मतदारसंघ तिसऱ्या वेळेस भाजपाला संधी देणार का? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget