एक्स्प्लोर
कुडाळ विधानसभा मतदारसंघ | नारायण राणे आपला गड परत मिळवणार का?
राणेंचा दोनदा पराभव झाल्यानंतर राणे पुन्हा एकदा 2019 च्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय आखाडा चांगलाच रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार.
तळकोकणात सध्या तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघ, कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघ असे एकूण तीन मतदारसंघ सिंधुदुर्गात आहेत. देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला गेला आहे. मात्र पर्यटनाच्या माध्यमातून हवा तसा जिल्ह्याचा विकास झालेला नाही. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण हे मालवण असल्याने आतापर्यंत कुठल्याही आमदार, खासदाराने लक्ष दिलेले नाही. जगभरातून मालवणमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र पर्यटनाच्या पायाभूत सुविधांचा वाणवा पाहायला मिळतो.
कुडाळ विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणं प्रांतानुसार बदलतात. मालवण किनारपट्टी भागात गाबीत समाजाचे वर्चस्व आहे. तर अन्य भागात दोन्ही तालुक्यात सर्वच जातीचे लोक राहतात. या मतदारसंघात मच्छीमार समाजाचा प्रभाव असल्याने ज्या पक्षाच्या बाजूने हा समाज असेल तो उमेदवार निश्चित निवडून येतो, असे गणित आहे. कारण 2014 च्या निवडणुकीत मच्छीमार समाज राणेंच्या विरोधात होता त्याचा परिणाम म्हणून राणेंचा पराभव झाला. त्यामुळे मच्छीमार समाजाची मत निर्णायक ठरू शकतात.
2009 साली कुडाळ - मालवण विधानसभा मतदार निवडणुकीत नारायण राणे (काँग्रेस), वैभव नाईक (शिवसेना), डॉ. प्रसाद वैंगणकर (अपक्ष), रविंद्र कासळकर (बसपा), सुरेंद्र बोरकर (रासप) असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यावेळी नारायण राणे आणि वैभव नाईक यांच्यातच मुख्य लढत होती. नारायण राणे यांना 71 हजार 921 तर वैभव विजय नाईक यांना 47 हजार 666 मतं पडली. याच मोठ्या मताधिक्क्याने नारायण राणे यांनी विजय मिळवला.
महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांपैकी नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते. आक्रमक भाषाशैली आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र नारायण राणे यांचा 2014 साली शिवसेनेचे वैभव नाईक यांनी पराभव केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे (काँगेस), वैभव नाईक (शिवसेना), पुष्पसेन सावंत (काँगेस) निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत नारायण राणेंना 60,206 मते, वैभव नाईक 70,502 मतं पडली. 10,376 मतांनी वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला आणि 2014 साली राणेंचा बालेकिल्ला ढासळला. आता 2019 च्या निवडणुकीत नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरून कमबॅक करतील का? याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचा लक्ष लागला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणे, युती झाल्यास शिवसेनेकडून विद्यमान आमदार वैभव नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून परशुराम उपरकर मैदानात असतील. युती न झाल्यास भाजपकडून अतुल काळसेकर, आघाडीकडून काँगेसचे माजी आमदार पुष्पसेन सावंत, काका कुडाळकर हे इच्छुक उमेदवार आहेत. राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरले नाही तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, विशाल परब हेही या कुडाळ मालवण मतदारसंघात इच्छुक आहेत. त्यामुळे नारायण राणे या निवडणूक रिंगणात उतरले नाही तर राणेंचा कस लागणार आहे. कारण पक्षातून एकाच मतदारसंघात अनेकजण इच्छुक असल्याने नाराजी नाट्य पाहायला मिळू शकतं.
नारायण राणे 1996 मध्ये शिवसेना भाजप सरकारमध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री झाले. 1999 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. 2005 पर्यंत ते शिवसेनेचे सदस्य होते. 2005 ला शिवसेना सोडून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. 2009 मध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2014 मध्ये शिवसेनेकडून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर दोनच वर्षात त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. नारायण राणे आत्तापर्यंत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उद्योग, वस्त्रोद्योग मंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत. मात्र त्यांचा 2014 ला कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर राणे कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचे चित्र सिंधुदुर्गात पाहायला मिळालं. 2014 मध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघात पराभव झाल्यानंतर वांद्रे येथील पोटनिवडणुकीत सुद्धा राणे यांचा पराभव झाला. राणेंचा दोनदा पराभव झाल्यानंतर राणे पुन्हा एकदा 2019 च्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याबाबतचे संकेत त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय आखाडा चांगलाच रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार.
2009 च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र
नारायन राणे (काँग्रेस) - 71921
वैभव नाईक (शिवसेना) - 47666
डॉ. प्रसाद वैंगणकर (अपक्ष) - 1947
रवींद्र कासळकर (बसपा) - 1503
सुरेंद्र बोरकर (रासप) - 1427
2009 च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र
वैभव नाईक (शिवसेना) - 70502
नारायन राणे (काँगेस) - 60206
2019 च्या विधानसभेसाठी संभावित उमेदवार
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष - नारायण राणे, राणेंच्या पक्षातून इच्छुक उमेदवार जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, विशाल परब
युती असल्यास शिवसेनेकडून वैभव नाईक, युती न झाल्यास भाजपकडून अतुल काळसेकर
काँगेस- माजी आमदार पुष्पसेन सावंत, काका कुडाळकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- परशुराम उपरकर
जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement