एक्स्प्लोर

Kolhapur North Bypoll LIVE : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत दुपारी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 टक्के मतदान

Kolhapur North By Election 2022 : भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केलेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. भाजपच्या सत्यजित कदम आणि काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्यात लढत

Key Events
Kolhapur North Vidhan Sabha By Election 2022 kolhapur election latest news polling for kolhapur north assembly seat today live updates Kolhapur North Bypoll LIVE : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत दुपारी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 टक्के मतदान
LIVE_BLOG

Background

Kolhapur Election 2022 : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकूण 357 केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसाठी 357 ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवण्यात आलेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकूण 7 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत. एकूण 550 पोलीस कर्मचाऱ्यांचा फोजफाटा तिथे तैनात करण्यात आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत 80 वर्षांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच मत नोंदवण्यात आलं होतं. तसाच प्रयोग आता या निवडणुकीत केला जाणार आहे.

महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून, दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.

रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभा कोल्हापुरात पार पडल्या. शेवच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला संबोधीत केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून येणार हे नक्की असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. 

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनीही प्रचारसभा घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.  कोल्हापुरात मंत्री मोठ्या प्रमाणात दहशत माजवत आहेत. ही दहशत मतदार मोडून काढतील आणि भाजपला मतं देतील. महाविकास आघाडीबद्दल नागरिकांत संताप आहे. महापुरात हे सरकार काही देऊ शकले नाही.  कोल्हापूरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे? येथील मंत्र्यांमुळे कोल्हापूरकरांचा पूर्ण भ्रमनिरास झाला असल्याची टीका फडणीवस यांनी केली.

दरम्यान, कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. दोघांनीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. फडणवीसांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री ठाकरेंनी सडेतोड उत्तरं दिली होती. आज सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर पोटनिवडणूकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

17:39 PM (IST)  •  12 Apr 2022

Kolhapur : संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 टक्के मतदान

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक मतदान टक्केवारी

संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 % मतदान

एकूण 1 लाख 61 हजार 289 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

84 हजार 566 पुरुष तर, 76 हजार 721  महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

17:33 PM (IST)  •  12 Apr 2022

Kolhapur : कोल्हापुरात चुरशीनं मतदान; महाविकास आघाडी की भाजप हा फैसला 12 तारखेला

कोल्हापूर: राज्याचं लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शेवटची माहिती हाती येईपर्यंत ... टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम हे आमने-सामने असून त्यांचे भवितव्य मतपेठीत बंद झालं आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,91,549 इतकं मतदान असून त्यापैकी 1,45,626 मतदान हे पुरुष मतदान असून 1,45,901 हे स्त्री मतदान आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 44.93 टक्के मतदान झालं होतं. त्यावेळेपर्यंत एकूण 1 लाख 31 हजार 108  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी 69 हजार 789 पुरुष तर, 61,318 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget