एक्स्प्लोर
कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरिता मोरे
कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा 41 विरुद्ध 33 मतांनी पराभव केला
कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरिता नंदकुमार मोरे विराजमान झाल्या आहेत. भाजप-ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला. 41 विरुद्ध 33 मतांनी सरीता मोरे विजयी झाल्या. तर काँग्रेसचेच भूपाल शेटे उपमहापौरपदी निवडून आले आहेत.
महापौर, उपमहापौरपद काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे कायम राखत आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्का दिला. या निवडणुकीत शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित राहिले. कोल्हापूर महापौर-उपमहापौरपदासाठी आज निवडणूक झाली. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद आरक्षित आहे.
अल्पमतात असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीने सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का देत त्यांच्या नगरसेवकांची पदे रद्द करण्याचा डाव रचल्यामुळे या निवडणुकीने वेगळे वळण घेतले होते. निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 41, तर भाजप-ताराराणी आघाडीचे 33 इतके बलाबल राहिले. शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व कायम राहिले.
भाजपनेही निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार उतरवल्याने कोणत्याही क्षणी काहीही होईल, या शक्यतेने काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे धोका निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक पक्षांतर बंदीच्या कायद्यांतर्गत अपात्र झाले. जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्याने पाच नगरसेवक अपात्र ठरले.
या निवडणुकीत माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका अश्विनी रामाणे यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. या निवडीच्या दरम्यान महानगरपालिका परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोषी वातावरणात मिरवणुका काढल्या.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी भाजपला मतदान केले होते. राष्ट्रवादीने त्यांच्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाईसाठी तक्रार केली होती. तब्बल दहा महिन्यांनंतर महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांना नेमकं अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे त्यांना महापौर निवडणुकीत मतदान करता आलं नाही.
जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत दाखल न केल्याने महापालिकेतील पाच नगरसेवकांवर टांगती तलवार होती. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आणि भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. या नगरसेवकांवर गंडांतर आणून काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. त्यानुसार मंत्रालयात कार्यवाहीही सुरु झाली. महापौर, उपमहापौर निवडणुकीपूर्वी पाच नगरसेवकांची पदे रद्द केल्याचा आदेश महापालिकेत धडकण्याची भीती होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
राजकारण
विश्व
Advertisement