एक्स्प्लोर

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडी सरस ठरणार? भाजप यंदा तरी कमळ फुलवणार? 10 मतदारसंघात कोण कोणाविरोधात

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर उत्तरमध्ये झालेल्या प्रचंड राजकीय उलथापालथीमुळे कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणुकीत सुद्धा चर्चेत आहे.

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर उत्तरमध्ये झालेल्या प्रचंड राजकीय उलथापालथीमुळे कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणुकीत सुद्धा चर्चेत आहे. महायुतीसह उद्धव ठाकरे यांनीही प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फोडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या 10 जागा आहेत, तर कोल्हापूर आणि हातकणंगले असे लोकसभा मतदारसंघ आहेत.  

फक्त करवीरनगरीच नव्हे, तर अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आणि करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी 1 लाख 54 हजार 964 मतांनी विजय मिळवला. शाहू महाराज यांच्या विजयाने कोल्हापूरचा शाहू-फुले-आंबेडकर पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये आणखी बुलंद झाला. विरोधी संजय मंडलिक यांना 5 लाख 99 हजार 558 इतके मताधिक्य मिळाले. पोस्टल मतदानापसून ते शेवटच्या फेरीपर्यंत शाहू महाराज यांनी घेतलेली आघाडी कायम राहिली. प्रचारातील एकसंधपणाही काँग्रेससाठी निर्णायक ठरला होता.  

कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसने दुष्काळ संपवला

कोल्हापूर लोकसभेला काँग्रेस खासदार निवडून आल्याने काँग्रेसचा 25 वर्षांपासूनचा दुष्काळ संपला आहे. 1998 नंतर प्रथमच काँग्रेसचा खासदार विजय मिळवला आहे. कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसची ताकद जास्त असल्याने जागा सतेज पाटील यांनी आपल्याकडे खेचली होती. हातकणंगलेदमध्ये अटीतटीच्या लढतीत ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरुडकर यांचा शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. 

2019 मध्ये काय घडलं? 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर, करवीर, दक्षिण आणि हातकणंगलेमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. इचलकरंजीमध्ये अपक्ष प्रकाश आवाडे यांनी विजय मिळवला होता. शिरोळमध्येही अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजय मिळवला होता. कागलमध्ये अजित पवार गटात असलेल्या हसन मुश्रीफ आणि चंदगडमध्ये राजेश पाटील यांनी विजय मिळवला होता. राधानगरीमधून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर विजयी झाले होते. शाहुवाडीतून विनय कोरे विजयी झाले होते. 

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 कोल्हापूर दक्षिण  अमल महाडिक  ऋतुराज पाटील  अरुण सोनवणे  
2 कोल्हापूर उत्तर  राजेश क्षीरसागर  राजेश पाटील (पुरस्कृत)    
3 करवीर चंद्रदीप नरके राहुल पाटील  संताजी घोरपडे  
4 हातकणंगले  अशोकराव माने राजू बाबा आवळे सुजित मिणचेकर   
5 इचलकरंजी राहुल आवाडे  मदन कारंडे     
6 शिरोळ राजेंद्र पाटील यड्रावकर  गणपतराव पाटील उल्हास पाटील   
7 शाहूवाडी-पन्हाळा विनय कोरे  सत्यजित पाटील     
8 कागल-गडहिंग्लज हसन मुश्रीफ समरजितसिंह घाटगे    
9 चंदगड  राजेश पाटील  नंदाताई बाभुळकर     
10 राधानगरी भुदरगड प्रकाश आबिटकर के. पी. पाटील    

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

1) कोल्हापूर दक्षिण

भाजपचे अमल महाडिक विरुद्ध काँग्रसचे ऋतुराज पाटील 

2) कोल्हापूर उत्तर 

शिवसेना  शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर 

3) करवीर 

काँग्रेसचे राहुल पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके

4) हातकणंगले 

काँग्रेसचे राजूबाबा आवळे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार अशोकराव माने 

5) इचलकरंजी 

भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाचे मदन कारंडे

6) शिरोळ 

काँग्रेसचे गणपतराव पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर

7) कागल 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे विरुद्ध अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ  

8)  चंदगड 

अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर विरुद्ध भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील

9) राधानगरी 

शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे केपी पाटील विरुद्ध अपक्ष ए. वाय. पाटील

10) शाहुवाडी 

जनसुराज्यचे विनय कोरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget