(Source: Poll of Polls)
Sukhvinder Singh Sukhu: वडील बसचालक, स्वत: दूधही विकलं; उच्चशिक्षित सुखविंदर सिंह सुखू यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा भन्नाट प्रवास
Himachal Pradeshचे मुख्यमंत्री होणारे सुखविंदर सिंह सुखू यांनी स्वतः शिमल्यामध्ये दूधाची विक्री केलीय.सुखविंदर सिंह सुखू हे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात.
Know About Sukhvinder Singh Sukhu: गुजरातमध्ये (Gujrat Election) सपाटून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसला (Congress) हिमाचल प्रदेशमध्ये (Himchal Pradesh Election) मात्र अच्छे दिन आले. काँग्रेसनं पुन्हा सत्तेत आल्यानंतर काही काळासाठी मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच झाली. शेवटी आता मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित झाले आहे. काँग्रेसने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर सुखविंदर सिंह सुखू यांच्या नावाला मंजुरी मिळाली. सोबतीला मुकेश अग्निहोत्री राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. सुखविंदर सिंह सुखू (Sukhvinder Singh Sukhu Oath)रविवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
कोण आहेत सुखविंदर सिंह सुखू
चार वेळा आमदार झालेल्या सुखविंदर सिंह सुखू यांची हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदासाठी वर्णी लागलीय. सुखविंदर यांचा जन्म 26 मार्च 1964 रोजी हमीरपूर जिल्ह्यातील नादौन तालुक्यातील सेरा गावात झाला. सुखविंदर सिंह सुखू यांचे वडील रसिल सिंह हे हिमाचल प्रदेश परिवहन महामंडळात बस चालक होते. सुखविंदर सिंह सुखू यांनी स्वतः शिमल्यामध्ये दूधाची विक्री केलीय. त्यांनी काही काळ दूध काउंटर चालवला आहे.
उच्चशिक्षित सुखविंदर सिंह सुखू
सुखविंदर सिंह सुखू यांनी हिमाचल प्रदेश विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले. राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी नेता म्हणून सुखविंदर सिंह सुखू यांनी केली. त्यांचं राजकारण सुरु झालं ते महाविद्यालयीन स्तरावरुनच. महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस आणि अध्यक्ष झाल्यानंतर ते 1989 ते 1995 दरम्यान NSUIचे अध्यक्षही होते.
अशी बहरली राजकीय कारकीर्द
1999 मध्ये सुखविंदर सिंह सुखू यांना युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले. 2008 पर्यंत ते या पदावर होते. यानंतर सखू यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली. ते दोन वेळा शिमला नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 2013 मध्ये हिमाचल काँग्रेसचे अध्यक्ष बनले, ते 2019 पर्यंत या पदावर राहिले.
चार वेळा आमदार
58 वर्षीय सुखविंदर सिंह सुखू हिमाचलमध्ये विक्रमी चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2003 मध्ये नादौन विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007, 2017 आणि आता 2022 मध्येही ते नादौनमधून आमदार झाले. सुखविंदर सिंग सुखू यांचं लग्न 11 जून 1998 रोजी कमलेश ठाकूर यांच्याशी झालं. त्या गृहिणी आहेत. त्यांना दोन मुली असून दोघीही दिल्ली विद्यापीठात शिकतात.
ही बातमी देखील वाचा
Sukhvinder Singh Sukhu : ठरलं! सुखविंदर सिंग सुखू होणार हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री