एक्स्प्लोर

BJP : एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार,तिकडे केरळमध्ये भाजपनं खातं उघडलं, डाव्या पक्षांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला

BJP : केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार बीबी गोपकुमार यांनी डाव्या पक्षांच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. बीबी गोपकुमार चार हजार मतांनी विजयी झाले. 

Kerala Election Result 2026 तिरुअनंतपुरम : केरळमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांचा पराभव झाला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूडीएफ सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. डाव्या पक्षांच्या एलडीएफचा यावेळी पराभव झाला आहे. केरळमध्ये भाजपनं (BJP) पहिला विजय मिळवला आहे. तर, आणखी दोन ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या चथन्नूर मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला आहे. 2021 मध्ये चथन्नूर विधानसभा मतदारसंघात डाव्या पक्षानं 17 हजार मतांनी विजय मिळवला होता. केजागारळमध्ये काँग्रेसच्या यूडीएफला 102 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, डाव्या पक्षांच्या एलडीएफला 35 जागांवर आघाडी मिळाली आहे.  भाजपनं एका जागेवर विजय मिळवलाय तर दोन ठिकाणी ते आघाडीवर आहेत. 

भाजपचे उमेदवार बीबी गोपकुमार यांनी डाव्या पक्षांचे उमेदवार अॅड. आर. राजेंद्रन यांचा 4398 मतांनी पराभव केला आहे. याशिवाय भाजपचे उमेदवार नेमोम आणि कझकोट्टम विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. 

भाजपच्या बीबी गोपकुमार यांना चथनूर विधानसभा मतदारसंघात  51923 मतं मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात लढणाऱ्या भाकपच्या आर राजेंद्रन यांना 47525 मतं मिळाली आहेत.तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे सूरज रवी आहेत, त्यांना 35276 मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात आम आदमी पार्टीला 613 मतं मिळाली आहेत. 
  
सायंकाळी पाचपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप आणखी दोन जागांवर आघाडी मिळवत आहे. गोपकुमार यांनी विजय मिळवला आहे. तर नेमम विधानसभा मतदारसंघात राजीव चंद्रशेखर आघाडीवर आहेत. त्यांना जवळपास तीन हजार मतांची आघाडी आहे. 

केरळमध्ये सत्तांतर 

केरळमध्ये 9 एप्रिलला मतदान झालं होतं. आज केरळ विधानसभेचा निकाल जाहीर झाला. गेल्या दोन निवडणुकांमध्ये केरळमध्ये एलडीएफचा विजय झाला होता. मात्र, यावेळी एलडीएफचा पराभव झाला आहे. काँग्रेस प्रणितयूडीएफ 100 जागांच्या जवळ पोहोचली आहे. तर एलडीएफ 30 जागांपर्यंत पोहोचली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून केरळमध्ये डावे पक्ष सत्तेत होते. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदललं जातं. मात्र, 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्त्वात एलडीएफनं विजय मिळवला होता. यावेळी मात्र काँग्रेस प्रणित यूडीएफनं सत्ता मिळवली आहे. केरळमधील संभाव्य निवडणूक निकालांचा अंदाज घेत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटस मधून मुख्यमंत्री पदाचा उल्लेख काढला होता. आता केरळमध्ये सत्ता बदल झाला असून काँग्रेसप्रणित यूडीएफ सत्तेत येईल. भाजपनं देखील केरळमध्ये खातं उघडलं आहे.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget