Karnataka Election Result 2023 Live Updates: सीएम बसवराज बोम्मई, काँग्रेसचे लक्ष्मण सवदी, डी. के. शिवकुमार आघाडीवर; जगदीश शेट्टर मात्र पिछाडीवर असल्याने धाकधूक वाढली
कर्नाटकमधील मातब्बर काँग्रेस नेते आघाडीवर असले, तरी जगदीश शेट्टार पिछाडीवर आहेत. शेट्टर हे भाजपचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Karnataka Election Result 2023 Live Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल करत असला, तरी काठावरील बहुमत लक्षात घेऊन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कर्नाटकमधील मातब्बर काँग्रेस नेते आघाडीवर असले, तरी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या जगदीश शेट्टार पिछाडीवर आहेत. जगदीश शेट्टार हे भाजपचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आघाडीवर आहेत. अथणीमधून लक्ष्मण सवदी आघाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्किार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांकही आघाडीवर आहेत.
Karnataka Election 2023: काँग्रेस सक्रिय
कर्नाटकात काँग्रेसची विजयाकडे वाटचाल सुरू केली असली, तरी काँग्रेस नेते डीके शिवकुमार एकामागून एक फोनवरून आमदारांच्या संपर्कात आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक होणार आहे. त्याचवेळी भाजप नेतेही जेडीएस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.
Karnataka Election 2023: मतांच्या विभागणीत काँग्रेस आघाडीवर
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक 73.19 टक्के मतदान झाले आहे. चिक्कबल्लापूर जिल्ह्यात सर्वाधिक 85.56 टक्के मतदान झाले आहे. काँग्रेसला सर्वाधिक 43 टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला आतापर्यंत केवळ 36 टक्के मते मिळाली आहेत.
Karnataka Chunav 2023:मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई हे हावेरी जिल्ह्यातील शिगगाव मतदारसंघातून आघाडीवर आहेत. बसवराज बोम्मई 1200 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे पठाण यासिर अहमद खान दुसऱ्या क्रमांकावर, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे शशिधर येलिगर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णपणे निराश झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एकही समितीचा एकही उमेदवार आघाडीवर आलेला नाही, तर बेळगाव जिल्ह्यातील 18 मधील 13 मतदारसंघावर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या निपाणी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे एकंदरीतच बेळगावमध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत आहे. अथणीमधून लक्ष्मण सवदी आघाडीवर आहेत. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी अत्यंत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरवणुका, सभा घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याच बरोबर दहा हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये जवळ 18 जागांसाठी 187 उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी एकूण 828 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या