एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Karnataka Election 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर जाण्याची शक्यता, सीमाभागात करणार भाजपचा प्रचार

Karnataka Election 2023: बेळगावसह अन्य सीमाभागातही ते प्रचार करतील, अशी माहिती समोर येत आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे.

Karnataka Election 2023:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचाराला (Karnataka Election) जाण्याची शक्यता आहे.. मुख्यमंत्री आपल्या टीमसह कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बेळगावसह अन्य सीमाभागातही ते प्रचार करतील, अशी माहिती समोर येत आहे. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तिथं सत्ताधारी भाजपला काँग्रेस आणि जेडीएसचं प्रमुख आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे भाजपचा प्रचार करण्यासाठीस जाण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला

कर्नाटकच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा त्या ठिकाणच्या राजकीय हालचाली वाढत आहेत.  केंद्रात पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.  प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने एप्रिल  पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत.  महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे . भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली  या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपने महाराष्ट्रातील सहा जणांची एक यादी तयार केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर आणि प्रसाद लाड या नेत्यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश नाही.   

 कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी भाजपला आपले कमळ फुलवता आलं आहे. त्यामुळे दक्षिणेत पाय रोवायचे असतील तर कर्नाटकमध्ये सत्ता कायम ठेवण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. त्यामुळे भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रीत केलं असून केंद्रीय नेतृत्वाने स्वतः या ठिकाणी लक्ष घातल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बीएस येडियुराप्पा यांनी नुकतंच सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. 

राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी

 कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.   कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या 224 इतकी आहे. सत्तेत येणाऱ्या पक्षाकडे 113 आमदारांचं संख्याबळ असणं गरजेचं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 October 2024Sambhajiraje Pune : अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमकRaj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Embed widget