एक्स्प्लोर

Amit Shah : 'दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांच्या जीवावर काँग्रेस लढतेय निवडणूक' अमित शाहांचा दावा; वक्तव्यामागे कसला संदर्भ?

Amit Shah : काँग्रेस दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना निवडणुकीसाठी उभे करुन विजयासाठीची लढाई लढते आहे. काँग्रेसकडे स्वत:च्या पक्षातील नेते नसल्याचा दावा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केला आहे.

Amit Shah : काँग्रेस (Congress) कडे निवडणूक लढवायला नेता नाही, म्हणून दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उधार नेत्यांच्या जीवावर मैदानात उतरली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली. कर्नाटकातील बागलकोटमध्ये दुपारी 35 अंश तापमानात अमित शाह (Amit Shah) यांचे भाषण सुरू होते. यावेळी अमित शाहांनी काँग्रेससोबतच भाजप सोडून गेलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला.

निवडणुकीसाठी भाजप (BJP) सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांवर ते अवलंबून आहेत, यातूनच काँग्रेसची दिवाळखोरी कळते असे अमित शाहा भाषणादरम्यान म्हणाले. यादरम्यान, भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांच्या पराभवावरुनही शाहा यांनी निशाणा साधला आहे.

भाजपकडून तिकीट न मिळाल्याने शेट्टर यांनी नुकताच पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हुबळी सेंट्रल विधानसभेतून काँग्रेसने शेट्टर यांना तिकीट दिले आहे. शेट्टर यांच्याशिवाय भाजपमधून आलेल्या लक्ष्मण सवदी यांनाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

कर्नाटकात कोणत्या पक्षातील नेत्यांची पक्षांतरं?

कर्नाटकातील 224 जागांसाठी काँग्रेस, भाजप आणि जेडीएसने उमेदवार जाहीर केले आहेत. जेडीएसने सर्वाधिक 28 पक्षांतर केलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहे. यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील नेत्यांचा समावेश आहे.

भाजपने इतर पक्षातून आलेल्या 17 नेत्यांना तिकीट दिले आहे. यात बहुतांश 2019 मध्ये ऑपरेशन लोटस दरम्यान भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांचा समावेश आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते अनंत सिंह यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह यालाही भाजपने तिकीट दिले आहे. अनंत सिंह हे बसवराज बोम्मई यांच्या सरकारमधले मंत्री आहेत. 

काँग्रेसने यावेळी पक्षांतर करणाऱ्यांना सर्वात कमी तिकिटे दिली आहेत. पक्षाने एकूण सहा तिकिटे इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना दिली आहेत. शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांच्या नावांचाही यात समावेश आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते की, भाजपमधून 150 लोक येण्यास तयार आहेत, पण आमच्याकडे जागा नाही, त्यामुळे सर्वांनाच घेतले जात नाही.

पक्षांतर करणाऱ्यांमुळे तीन राज्यांत भाजपचे सरकार

गेल्या पाच वर्षात पक्षांतर करणाऱ्यांमुळे भाजपला तीन राज्यात सरकार बनवता आले. कर्नाटकमध्ये 2019 मध्ये प्रथमच भाजप काँग्रेस आणि जेडीएसमधील पक्ष बदलणाऱ्यांमुळे सत्तेत आला. कर्नाटकमध्ये जेडीएसच्या एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते.

काँग्रेसचे 17 आमदार त्यावेळचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याविरोधात एकत्र आले आणि पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली. आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने कुमारस्वामी यांचे सरकार पडले आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर सर्व बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कर्नाटकानंतर मध्य प्रदेशातही 2019 मध्येच काँग्रेसचे सरकार पक्षांतर करणाऱ्यांमुळे पडले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 27 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले.

कर्नाटक आणि मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपचे सरकार पक्षांतर करणाऱ्यांमुळेच स्थापन झाले. 2022 मध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. यानंतर शिंदेंनी भाजपसोबत युती केली आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले.

काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते की, भाजपमधून 150 लोक येण्यास तयार आहेत, पण आमच्याकडे जागा नाही, त्यामुळे सर्वांनाच घेतले जात नाही.

संबंधित बातम्या:

राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरे गटातील उरलेले सर्व 13 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, उदय सामंतांचा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget