(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! कर्जत जामखेडमध्ये लीड कमी झाल्यानं रोहित पवारांच्या समर्थकाचा हृदयविकारानं मृत्यू
Vidhan Sabha Election 2024: आमदार रोहित पवारांचा लीड कमी झाल्यानं रोहित पवार यांच्या समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं स्वतः रोहित पवार यांनी सांगितलं आहे.
Karjat Jamkhed Assembly Constituency: राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Vidhan Sabha Election 2024) महायुतीनं (Mahayuti) घवघवीत यश मिळवलं. पण, महायुतीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhan Sabha Election) धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aaghadi) कार्यकर्ते पुरते हादरुन गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. राज्यातील लढतींपैकी कर्जत जामखेडची (Karjat Jamkhed) लढत अगदी उशीरापर्यंत रंगली. अटी-तटीच्या लढतीत रोहित पवारांना अगदी निसटता विजय मिळाला. सुरुवातीला रोहित पवारांचा 352 मतांनी पराभव झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, मशीनमध्ये तांत्रिक घोळ झाल्याने या जागेवर पुन्हा मतमोजणी करण्यात आली. यामध्ये रोहित पवार यांनी आघाडी घेत विजय नोंदवला. पण, रोहित पवारांचा लीड कमी झाल्यानं रोहित पवार यांच्या समर्थकाचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात खुद्द आमदार रोहित पवारांनी माहिती दिली आहे.
आमदार रोहित पवारांचा लीड कमी झाल्यानं रोहित पवार यांच्या समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं स्वतः रोहित पवार यांनी सांगितलं आहे. कर्जत तालुक्यातील शिंपोरा गावातील येजेराव काळे (वय 60) यांचा टीव्ही पाहत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. रोहित पवारांचा लीड कमी झाल्याचं पाहून हृदयविकाराच्या झटक्यानं येजेराव यांचा मृत्यू झाल्याचे रोहित पवारांनी सांगितलं. या मतदारसंघातील पवार साहेबांवर प्रेम करणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे काळे भाऊ लीड कमी झाली, त्यावेळी त्यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला त्यांना मी श्रद्धांजली वाहतो, असं रोहित पवार म्हणाले.
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांचा निसटता विजय
कर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांचा 1243 मतांनी विजय झाला आहे. रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मतं मिळाली. तर महायुतीचे आमदार राम शिंदे यांना 1 लाख, 26 हजार 433 मतं मिळाली आहे. अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना 3489 मतं मिळाल्याचा फटका रोहित पवार यांना बसल्याचं पाहायला मिळालं. तर अपक्ष राम नारायण शिंदे यांना 392 नोटाला 601 मतं मिळाली.
पाहा व्हिडीओ : Rohit Pawar Aahilyanagr : रोहित पवारांचा लीड कमी झाल्याने समर्थकाचा हृदयविकाराने मृत्यू