Maharashtra Election 2024 : साताऱ्यातील ग्रामपंचायतीचा EVM विरोधात ठराव, पृथ्वीराज चव्हाणांच्या मतदारसंघातील गावाचा विरोध!
Karad South Assembly Election Result : मारकरवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर आता साताऱ्यातील कराड तालुक्यातील कोळेवाडी हा देशातला पहिला ईव्हीएमला विरोध करणारे गाव ठरले आहे.
Karad South Assembly Election Result सातारा: राज्यात विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Vidhansabha Election) निकाल लागल्यापासून माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव राज्यात नाही तर देशभरात चर्चेत आलं आहे. ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेल्या मारकडवाडी गावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, याच मुद्यावरून आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी थेट मारकडवाडी गाठत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे.
ईव्हीएम विरोधात ग्रामपंचायतीमध्ये ठराव
दरम्यान, राज्यात 'ईव्हीएम हटाव, देश बचाव'चा हल्लाबोल विरोधकांकडून केला जात असून मारकरवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर आता साताऱ्यातील कराड तालुक्यातील कोळेवाडी (Karad South Assembly Election Result 2024) हा देशातला पहिला ईव्हीएमला विरोध करणारे गाव ठरले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हे कोळेवाडी गाव असून येथील ग्रामस्थांच्या वतीने हा ठराव करण्यात आला आहे. या मतदारसंघातून भाजपचे अतुल भोसले यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा या ठिकाणी पराजय झाला आहे. त्यामुळे कोळेवाडी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून ईव्हीएमला विरोध दर्शवल्याने हे गाव नव्याने चर्चेत आले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांच्या मतदारसंघातील गावाचा विरोध!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना देखील विधानसभा निवडणुकीत अपयश आलंय. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अतुल भोसले (Atul Bhosale) यांना तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना तिकीट देण्यात आले होते. या निवडणुकीत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. अतुल भोसले यांनी यापूर्वी दोन वेळेस पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान पहिल्यांदाच आमदार झालेले अतुल भोसले यांचा विजय मोठा मानला जात आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत केले आहे. असे असताना हा मतदारसंघ आता नव्यानं वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आला आहे.पृथ्वीराज चव्हाणांच्या मतदारसंघात ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजूर करत ईव्हीएमला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकं काय पाऊले उचली जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या