एक्स्प्लोर

भाजपमध्ये बंडाळीचे संकेत, महेश गायकवाडांचा इशारा; गणपत गायकवाडांना कल्याणमधून उमेदवारी दिली तर अपक्ष लढेन!

भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली तर अपक्ष निवडणूक लढवणार असा इशारा   शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी भाजपला इशारा दिला आहे.  

मुंबई : मुख्यमंत्र्याचे चिंरजीव  खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)  यांचे समर्थक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी असलेले कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी मिळू न देण्यासाठी शिवसेनेने चंग बांधला आहे.जर उमेदवारी नाही मिळाली तर  कल्याण पूर्वमध्ये शिवसेनाशहर प्रमुखांनी बंडाचे संकेत दिले आहे.मतदारसंघ महेश गायकवाड यांना मिळावा असा शिंदे गटाचा आग्रह आहे. त्यासाठी कल्याण पूर्व घेऊन कल्याण पश्चिम देण्याची शिंदे गटाची तयारी आहे.

भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली तर अपक्ष निवडणूक लढवणार असा इशारा   शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी भाजपला इशारा दिला आहे.   आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघ   बकाल करून ठेवला आहे असा आरोप देखील महेश गायकवाड यांनी केला आहे.   कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या रचनेत या मतदारसंघाची निर्मिती झाली. यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिकेतील काही वॉर्ड येतात. तर, गणपत गायकवाड हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

गणपत गायकवाड 2009 पासून या मतदारसंघाचे आमदार

कल्याण पूर्वेत गोळीबार प्रकरणामुळे तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड 2009 पासून या मतदारसंघाचे आमदार आहेत. 2009, 2014, 2019 असे तीन टर्म म्हणजेच तब्बल पंधरा वर्षे त्यांनी कल्याण पूर्वेत काम केलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनाच तिकिट मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कल्याण पूर्वच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड यांचाच पहिला दावा असल्याचं राज्याचे मंत्री आणि भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं होते

गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार 

भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला.  जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड  (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली.  या दोघांच्या दरम्यान एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. शुक्रवारी 2 फेब्रुवारीला हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दोघेही आले होते. यादरम्यान, गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला.  

हे ही वाचा :

नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक, आता केसरकरांच्या पराभवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत परततोय, राजन तेलींची गर्जना!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवारAjit Pawar meet Sharad Pawar full Video : भेट घेतली, केक कापला, शरद पवार-अजित पवार भेटीचा  व्हिडीओAjit Pawar meet Shard Pawar : प्रफुल पटेलांनी 10 दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेटSanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Embed widget