एक्स्प्लोर
विनोद तावडेंना उमेदवारी नाकारल्यावर जितेंद्र आव्हाडांना 'तो' किस्सा आठवला, आव्हाड म्हणतात...
आम्ही एकमेकांवर राजकीय टीका केल्या असतील मात्र तरीही विनोद तावडे माझे चांगले मित्र आहेत. मी रागीट आहे, फटकळ आहे, त्यामुळे विधानसभेत त्यावेळी तसं बोलून गेलो. मात्र विनोद तावडे यांना राजकीय दृष्ट्या असा धक्का मिळेल, असं माझ्या ध्यानी, मनी, स्वप्नीही नव्हतं, असेही आव्हाड म्हणाले.
मुंबई : विधानसभेच्या शेवटच्या सत्रात मी बोलत असताना माझं भाषण थांबवून मी आरडाओरड केल्यावर विनोद तावडे यांनी म्हटलं होतं की 'अध्यक्ष महोदय, त्यांना बोलू द्या. ते पुढच्या वेळेस विधानसभेत येतील की नाही याची शाश्वती नाही'. त्यावेळी मी म्हटलं होत की 'विनोदजी माझ्या मतदारसंघात या. तुमचा जर 75 हजार मतांनी पराभव केला नाही तर बापाचं नाव सांगणार नाही', मी अर्थात रागात बोललो होतो. मला त्याबद्दल नंतर वाईट वाटलं होतं. मात्र आज विनोद तावडे यांचंच तिकीट कापलं गेलं. हे खूपच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाची बोलताना व्यक्त केली आहे. काहीही असो विद्यार्थी दशेपासून भाजप आणि अभाविपचे काम करणारे आणि सेवा केलेले कार्यकर्ते आहेत, असेही ते म्हणाले.
आम्ही एकमेकांवर राजकीय टीका केल्या असतील मात्र तरीही विनोद तावडे माझे चांगले मित्र आहेत. मी रागीट आहे, फटकळ आहे, त्यामुळे विधानसभेत त्यावेळी तसं बोलून गेलो. मात्र विनोद तावडे यांना राजकीय दृष्ट्या असा धक्का मिळेल, असं माझ्या ध्यानी, मनी, स्वप्नीही नव्हतं, असेही आव्हाड म्हणाले.
आव्हाड म्हणाले की, मी त्यांच्याशी याबाबत बोललेलो नाही आणि बोलणार देखील नाही. मी काही त्यांना तिकीट देऊ शकत नाहीही किंवा मी त्यांच्या पक्षात कुणाला बोलू शकत नाही. या क्षणाला त्यांच्या परिवारात काय भावना असतील हे मला कळतंय. अशी वेळ कुणावरही येऊ नये, ते मंत्री असताना माझी चार काम केली चार केली नाहीत. मात्र आज माणूस म्हणून ज्या भावना असाव्यात त्याच माझ्या आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
उमेदवारी नाकारण्याचे कारण पक्षाने सांगितलं नाही, पण निवडणुकीनंतर चर्चा करेन : विनोद तावडे
विधानसभा निवडणुकीसाठी बोरिवली विधानसभेचे विद्यमान आमदार आणि मंत्री विनोद तावडे यांची उमेदवारी कापत सुनील राणे यांना संधी देण्यात आली आहे. तावडे यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी उमेदवारी नाकारण्याचे कारण पक्षाने सांगितलं नसल्याचं एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना तावडे म्हणाले की, आपण मंत्री नाहीत म्हणजे काम थांबणार नाही. आम्हाला नेशन फस्ट असं सांगितलं आहे. त्यामुळं इथून पुढं जी जबाबदारी दिली जाईल ती मनापासून पूर्ण केली जाईल, असे तावडे म्हणाले.
तावडे म्हणाले की, बोरिवलीसह राज्यातील सर्व उमेदवार निवडून येतील. स्पष्ट बहुमताने आम्ही सत्तेत येऊ. सध्या मला उमेदवारी का दिली नाही याच्या विश्लेषणाची वेळ नाही, मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर नक्की चर्चा होईल. आता निवडणुकांची वेळ आहे. मी नेता नाही मी कार्यकर्ता आहे. जे काम दिलं जाईल ते चांगल्या पद्धतीने करेन, असेही ते म्हणाले.
आमचे काम राष्ट्रनिर्माणाचं आहे. बरेच जण आमदार नाहीत तरी काम करतात. विद्यार्थी परिषद आणि संघाने आम्हाला राष्ट्रहिताचे काम करायचं शिकवलं आहे. मला उमेदवारी न देण्याचे कारण नक्की असेल मात्र अजून बोलता आलेलं नाही, मात्र पक्षनेतृत्वाची चर्चा केली जाईल. काही चुकलं असेल तर पक्ष सांगेल आणि नंतर संधी देईल, असेही तावडे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement