एक्स्प्लोर

Jalgaon District Vidhan Sabha Election: जळगावातील 11 विधानसभा मतदारसंघांत कोण-कोणाला आव्हान देणार? कोणत्या पक्षाचं पारडं जड ठरणार?

Maharashtra District Vidhan Sabha Election 2024: जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण-कोणाला आव्हान देणार? राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार?

Jalgaon District Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) यंदा एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला सर्व विधानसभांमध्ये मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत. मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे. सध्याचे 2024 चे चित्र पाहता जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी 6 मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचं दिसून आलं. बंडखोरांना माघारी घेण्यासाठी महायुतीपुढं तसं मोठं आव्हान होतं. मात्र, अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यात मंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. दरम्यान, जिल्ह्यातील या 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण-कोणाला आव्हान देणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

जळगाव जिल्ह्यात अकरा मतदार संघ आहेत, यामधील प्रमुख लढती जाणून घ्या

जळगाव शहर मतदारसंघ - या मतदार संघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलीय. तर भोळे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या (उबाठा) जयश्री महाजन लढणार आहेत. तर कुलभूषण पाटील आणि मनसे डॉ. अनुज पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे  कुलभूषण पाटील हे अपक्ष लढणार आहेत. 

जामनेर मतदार संघ - भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे रिंगणात आहेत.

जळगाव ग्रामीण मतदार संघ - महायुतीचे  उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील विरोधात महाविकास आघाडीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात आहेत.

अमळनेर मतदार संघ - महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ अनिल शिंदे, त्याचबरोबर भाजपचे बंडखोर नेते अपक्ष शिरीष चौधरी रिंगणात असतील

पाचोरा मतदार संघ - महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरुद्ध त्यांच्या भगिनी शिवसेना (उबाठा) वैशाली सूर्यवंशी, बंडखोर दिलीप वाघ, अमोल शिंदे यांच्यात चौरंगी लढत होत आहे

एरंडोल विधानसभा मतदारसंघ - एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अमोल चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) डॉ सतीश पाटील रिंगणात असतील. तर या निवडणुकीत शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख हर्षल माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. संभाजी पाटील, भाजपाचे माजी खासदार एटी नाना पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमित पाटील हे अपक्ष म्हणून लढणार आहेत.

चोपडा विधानसभा मतदारसंघ - चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांच्या विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) प्रभाकर सोनवणे यांच्यात लढत होणार आहे.

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ - हा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केल्याचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. आता चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार उन्मेष पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. 

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ - मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडी तर्फे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध अपक्ष विनोद सोनवणे यांच्यात लढत होणार आहे.

भुसावळ विधानसभा मतदारसंघ - जळगाव जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघाची चर्चा आहे. कारण भुसावळमध्ये भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे राजेश मानवतकर यांच्यात थेट लढत होणार आहे. 

रावेर विधानसभा मतदारसंघ - रावेर मतदारसंघ भाजपाचे हरिभाऊ जावडे यांचे पुत्र अमोल जावळे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे धनंजय चौधरी, तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी, वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील, काँग्रेसचे (अपक्ष म्हणून लढणार) दारा मोहम्मद अशी लढत होणार आहे.

हेही वाचा>

Jalgaon Jamod Assembly Election 2024 : विधानसभेची खडाजंगी : जळगाव जामोद मतदारसंघात तिरंगी लढत, संजय कुटे की स्वाती वाकेकर कोण बाजी मारणार ?

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget