Jalgaon Jamod Assembly Election 2024 : संजय कुटेंचा मोठा विजय! जळगाव जामोद विधानसभेत काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांच्या पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जळगाव (जामोद) विधानसभा जागा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.
Sanjay Kute Jalgaon Jamod Assembly Election 2024 : जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. या लढतीती महायुतीचे उमेदवार डॉ. संजय कुटे 18 हजार 814 मतांनी विजयी झाले तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून डॉ. स्वाती वाकेकर आणि वंचित बहुजन आघाडीने डॉ. प्रविण पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.
जळगाव (जामोद) विधानसभा जागा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. ही जागा पूर्वी अस्तित्वात होती पण 1957 मध्ये राज्याच्या निवडणुकीसाठी ती विसर्जित करण्यात आली. 2008 मध्ये जळगाव (जामोद) विधानसभा जागा पुन्हा अस्तित्वात आली. जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ 2008 पासून भाजपकडे आहे. यावेळी भाजपला तो अबाधित राखायचा आहे. तर गेल्या वेळी तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आलेली काँग्रेस यावेळी पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी मोठ्या प्रयत्नात आहे. भाजपाने संजय कुटे तर काँग्रेसकडून डॉ. स्वाती वाकेकर यांना तिकिट दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीही शर्यतीत असणार आहे. त्यांनी डॉ. प्रवीण पाटील यांना तिकिट दिले आहे. अशा स्थितीत यावेळी तिरंगी लढत अपेक्षित आहे.
जळगाव (जामोद) विधानसभा जागा बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. ही जागा पूर्वी अस्तित्वात होती. पण 1957 मध्ये राज्याच्या निवडणुकीसाठी ती विसर्जित करण्यात आली. 2008 मध्ये सीमांकन झाल्यानंतर जळगाव (जामोद) विधानसभा जागा पुन्हा अस्तित्वात आली. सीमांकनानंतर या जागेवर 2009 पासून आतापर्यंत तीन विधानसभा निवडणुका झाल्या. येथून भाजपचे संजय कुटे हे तिन्ही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. पहिल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती. परंतु 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने मतांची टक्केवारी वाढवल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजपकडून संजय कुटे हे प्रबळ दावेदार आहेत. तर काँग्रेसकडून स्वाती वाकेकर आणि रामविजय बुरुगले हे प्रबळ दावे करत आहेत. भाजप सेना महायुतीकडे अद्याप दुसरा चेहरा नसल्याने बंडखोरी होण्याची शक्यता नाही. वंचित बहुजन विकास आघाडी कडेही सध्या दोन दावेदार प्रबळ आहेत.
जळगाव जामोद- गेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संजय कुटे यांनी काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांचा पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीचे संगीतराव भोंगळ या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिले होते. या निवडणुकीत संजय कुटे 1,02, 735 मते मिळवून विजयी झाले होते. तर काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांना 67,504 मते मिळाली होती. तर तिसऱ्या स्थानावरील संगीतराव भोंगळ यांना 29 हजार 985 मते मिळाली होती.