एक्स्प्लोर

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ : पराभव का होतो यासाठी काँग्रेस आत्मपरीक्षण करणार का?

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक संख्येने इच्छुक उमेदवारांची रस्सीखेच पाहायला मिळते. कधी काळी काँग्रेसचा गड असलेला हा मतदारसंघ आता कामगार कल्याण मंत्री संजय कुटे यांच्या नावाने ओळखला जातो. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसमध्ये एवढे उत्सुक असतात की त्यांच्यातल्या स्पर्धेमुळे संजय कुटे यांचा विजय सोपा होतो.

कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात आता ठिकठिकाणी पराभवाचे धक्के बसत आहेत. याच बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद हा एक विधानसभा मतदार संघ आहे. हा मतदारसंघ मागील 15 वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. काँग्रेस या मतदार संघात विजयाच्या जवळपास पोहचते, मात्र पक्षांतर्गंत कुरापतींमुळे घात होतो. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत जळगाव जामोदमधून शिवसेनेला सर्वाधिक मताधिक्य मिळालं आहे.
जळगाव जामोद मतदार संघामध्ये भाजपचे कामगार कल्याण मंत्री डॉ संजय कुटे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी पंधरा वर्षे आधी तीन टर्म आमदार राहिलेले कृष्णराव इंगळे यांचा पराभव करत बहुतांश काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या ताब्यात घेतला आहे. 1989 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले कृष्णराव इंगळे पहिल्यांदा या मतदारसंघांमधून आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 1994 व 1999 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते विजयी झाले. त्यानंतर 2004 च्या निवडणुकीमध्ये डॉ संजय कुटे यांनी कृष्णराव इंगळे यांचा पराभव केला.
भाजपा सरकारने केंद्रात आणि राज्यात केलेली विकास कामे त्याचबरोबर मतदारसंघातील आमदार डॉ संजय कुटे यांनी पाठपुरावा करत केलेली 140 गावांची पाणीपुरवठा योजना, शेगाव विकास आराखडा याच मुद्द्यावर भाजपा मते मागणार आहे, या मतदार संघांमध्ये पाण्यातील क्षाराचं प्रमाण अधिक असल्याने तेरा वर्षात साडे चार हजार रुग्णांचा किडनी निकामी होऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे वेळोवेळी या परिसरामध्ये डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी आंदोलने केली गेली मात्र, अद्याप पर्यंत ते होऊ शकलेले नाही. इतरही बाबतीत येथील आरोग्य यंत्रणा ढासळलेली पाहायला मिळते, त्यामुळे या प्रमुख मुद्द्यासह संथ गतीने सुरू असलेला शेगाव विकास आराखडा, त्याचबरोबर अपूर्ण असलेली एकशे चाळीसगाव योजना आणि अंबाबरवा अभयारण्यातून आदिवासींच्या पुनर्वसनात मोठ्या प्रमाणावर झालेला भ्रष्टाचार त्यामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या समाजाच्या प्रश्नावर विरोधक भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव सहा विधानसभा मिळून 5 लाख 20 हजार 537 मते मिळाली. तर काँग्रेस- राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना 3 लाख 88 हजार 293 मते मिळाली. . वंचित बहुजन आघाडीचे बलिराम सिरसकार, 1 लाख 72 हजार 306 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते.
2014 विधानसभा निवडणूक
१) डॉ. संजय कुटे- 63,888 (भाजपा). २) प्रसन्नजित पाटील - 59193 (भारिप). ३) रामविजय बुरुंगले - 36461 (काँग्रेस). ४)  संतोष घाटोळ - 9467 (शिवसेना).
विधानसभेसाठी आपल्याला काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून जिल्हा भरातून सर्वाधिक इच्छुक जळगाव जामोद मतदारसंघात आहेत. यामध्ये स्वातीताई वाकेकर, प्रसन्नजीत पाटील, प्रकाश अवचार, ज्योती ढोकणे, रमेश घोलप, संतोष राजणकर, अविनाश उमरकर, रंगराव देशमुख, अय्युब करीम, राजेश्वर देशमुख, शामराव डाबरे यांनी तिकीट मागितलं आहे. मात्र या मतदार संघात कुणाही एकाला तिकीट मिळालं की अन्य सर्व इच्छुक विरोधात जातात हे आतापर्यंतचं चित्र आहे. यामुळे भाजपाला विजयासाठी फारसं काही करण्याची गरज नसते. आता तर आमदार डॉ. संजय कुटे हे मंत्री झालेत त्यांनी मतदार संघात केलेला विकास आणि उभारलेली कार्यकर्त्यांची फळी याशिवाय मोदी क्रेझ यामुळे डॉ. कुटेंना विजयाचा आत्मविश्वास आहे.
या मतदार संघात मागील निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाकडून निवडणूक लढणारे प्रसन्नजीत पाटील यांचा अगदी कमी फरकाने पराभव झाला. भारिपला वंचितच्या रूपाने नवीन उभारी मिळालेली असतानाच पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हे त्यांच्ये राजकीय दुर्दैवच मानावं लागेल कारण आता वंचितकडून शेगाव येथून जिपचे माजी सदस्य भास्करराव पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष प्रसन्नजीत पाटील यांना उमेदवारी देण्याचा विचार करेल असं वाटत नाही. अश्या वेळी स्वाती वाकेकर या काँग्रेस कडून उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात. चित्र उलट झाल्यास वाकेकर या वंचितमध्ये उडी मारू शकतात असंही राजकीय जाणकारांना वाटतं. असं झाल्यास काँग्रेसकडून प्रसन्नजीत पाटील पुन्हा रिंगणात असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
×
Embed widget