एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझी पत्नी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढली तरी मी युतीधर्म पाळणार : चंद्रकांत पाटील
महाडिक यांच्यासोबतची मैत्री वैगरे बाजूला आधी युतीचा धर्म पाळणार असं वक्तव्य चंद्रकांत पाटील मुरगूड़मध्ये झालेल्या सेना-भाजपच्या मेळाव्यात केलंय. शिवाय स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन दादांनी उपस्थितांना केले.
कोल्हापूर : माझ्या पत्नीने उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तरीही मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं आहे. आज कोल्हापूरच्या मुरगूडमधील शिवसेना-भाजपच्या मेळाव्यात बोलत होते.
भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचे संजय मंडलिक लोकसभा लढवणार आहेत. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि चंद्रकांत पाटील यांच्या जवळकीमुळे चंद्रकांत पाटील नेमकं कुणाचा प्रचार करणार? असा प्रश्न सर्वचं कार्यकर्त्यांना पडला होता.
VIDEO | पत्नी राष्ट्रवादीत गेली तरीही प्रचार शिवसेनेचाच : चंद्रकांत पाटील | कोल्हापूर | एबीपी माझा
महाडिक यांच्यासोबतची मैत्री वैगरे बाजूला आधी युतीचा धर्म पाळणार असं वक्तव्य चंद्रकांत पाटील मुरगूड़मध्ये झालेल्या सेना-भाजपच्या मेळाव्यात केलंय. शिवाय स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन दादांनी उपस्थितांना केले.
संबंधित बातम्या
...म्हणून शिवसेनेने भाजपशी युती केली: चंद्रकांत पाटील
काँग्रेस-राष्ट्रवादीने कितीही बोंबलू दे, मतदान भाजपलाच होणार : चंद्रकांत पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement