By Election Result : कोण मारणार बाजी? 6 राज्यांतील 7 विधानसभांसाठीच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल
By-Elections in Six States : आज सहा राज्यांतील सात विधानसभेच्या जागांवरील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
By Election Result 2022 : देशात सहा राज्यांतील (Maharashtra News) विधानसभेच्या (Assembly Election 2022) सात रिक्त जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतदानाचा आज निकाल आहे. या पोटनिवडणुका म्हणजे, 2024 विधानसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट असल्याचंही सांगितलं जात आहे. महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपनं (BJP) अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. पण इतर ठिकाणी मात्र भाजपची कसोटी पाहायला मिळणार आहे.
6 राज्यांतील 7 विधानसभांच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल
आज सहा राज्यांतील विधानसभेच्या सात रिक्त जागांचा निकाल लागणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व (Andheri East), उत्तर प्रदेशमधील गोळा गोकर्णनाथ (Gola Gokaran Nath), हरियाणातील आदमपूर (Adampur), बिहारमधील मोकाम (Mokama) आणि गोपाळगंज (Gopalganj), तेलंगाणातील मुनुगोडे (Munugode) आणि ओदिशातील धामनगर (Dhamnagar) मधील या पोटनिवडणुकीच्या निकालाचा समावेश आहे.
आज अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल
अंधेरी पूर्व येथे ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीचा निकाल आज लागणार आहे. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान 3 नोव्हेंबरला पार पडलं. आज या निवडणुकीचा निकाल आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
कोण मारणार बाजी?
एकीकडे हिमाचल प्रदेश, गुजरात आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्येक राजकीय पक्ष या निवडणुकीत व्यस्त असताना दुसरीकडे आज विविध राज्यांच्या विधानसभांच्या रिक्त जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल आहे. पोटनिवडणुकीच्या या निकालावर शिवसेना, भाजप, काँग्रेस, सपा आणि इतर अनेक राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. या निकालांचा गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालांवर परिणाम होईल की नाही, हे येत्या काळात समोर येईल.
सहा राज्यांतील विधानसभेच्या सात रिक्त जागांचा निकाल कुठे पाहाल?
- निवडणूक निकाल पाहण्यासाठी तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI - Election Commission of India) अधिकृत वेबसाइट eci.gov.in वर जा.
- येथे निकाल पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला ज्या निवडणुकीचा निकाल पाहायचा आहे ते पर्याय निवडा.
- यानंतर तुम्हाला ज्या विधानसभेच्या जागेचा निकाल पाहायचा आहे, त्या जागेचा पर्याय निवडा.
- निकाल पाहण्याचा दुसरा सोपा पर्याय आहे एबीपी माझा. एबीपी माझाच्या वेबसाइटवर तुम्हाला निकालाशी संबंधित प्रत्येक अपडेट मिळेल.