Hitendra Thakur : इकडे विनोद तावडे यांच्याकडून राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांना नोटीस, तिकडे हितेंद्र ठाकूर म्हणाले, तावडेंची टीप कुणी दिली हे...
Hitendra Thakur : . तावडेंची ती टीप कुणी दिली ते सांगणार नाही", असं बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
Hitendra Thakur : "माझे सर्वा सोबत संबंध आहेत, सर्व मला संपर्क करतात, समर्थनासाठी सर्वांनी फोन केला. माझ्या विभागाला सर्व प्रथम प्राधान्य असत, त्याप्रमाणे मी निर्णय घेतो. त्रिशंकू जरी परिस्थिती निर्माण झाली तरी आम्हाला महत्त्व असेल, आम्ही निवडून येऊ, राज्यात जे जास्त मताधिक्य तेवढे मताधिक्य आम्हाला असेल, त्यावेळी आम्ही आमच्या लोकांसाठीचा निर्णय घेऊ. राजकारणात संपर्क कुणाचा झाला, त्याची नाव सांगायची नसतात, काही सिक्रेशी असते ती राहू द्यायची असतात. मंत्री पदासाठी मी दावेदार नाही, मंत्री मी कधीच बनलो असतो. तावडेंची ती टीप कुणी दिली ते सांगणार नाही", असं बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी तावडेंनी काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. माफी मागा, अन्यथा 100 कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं तावडे यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.
हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना, बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडण्याच्या एक दिवस अगोदर माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला होता. विरार-नालासोपारामध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात वाद झाला. विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्याकडून करण्यात आला होता. विवांत हॉटेलमध्ये भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. येथील हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना, बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. त्यानंतर, बविआकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला, विशेष म्हणजे याठिकाणी रोख रक्कमही जप्त करण्यात आली होती. त्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. तर, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता, विनोद तावडे यांनी याप्रकरणी काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. माफी मागा, अन्यथा 100 कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं तावडे यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या