एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 Phase 2 Polling Live: नांदेडमध्ये मतदाराने मतदान मशिन फोडलं, कर्मचाऱ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न

Lok Sabha Election 2024 Phase 2 : राज्यात  आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होणार आहे

LIVE

Key Events
Lok Sabha Election 2024 Phase 2 Polling Live: नांदेडमध्ये मतदाराने मतदान मशिन फोडलं, कर्मचाऱ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न

Background

Lok Sabha Election 2024 Phase 2 Voting Live:  आज देशभरात दुसऱ्या टप्प्य़ाचं मतदान होणार आहे. देशात ८८ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण १२ राज्यात आज मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात  आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होईल. अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळातल्या वायनाड मतदारसंघात आज मतदान होणार आहे. राहुल गांधींविरोधात वायनाडमध्ये भाजपचे के. सुरेंद्रन आणि सीपीआयच्या अॅनी राजा या रिंगणात आहेत. त्याशिवाय मथुरेतून हेमामालिनी, कोटा बुंदी या राजस्थानातल्या मतदारसंघातून मावळते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राजनांदगावमधून भुपेश बघेल, तिरूअनंतपुरममधून शशी थरूर, दक्षिण बंगळुरूतून भाजपचे तेजस्वी सूर्या, मेरठमधून भाजपचे अरूण गोविल यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.  

16:43 PM (IST)  •  26 Apr 2024

Nanded Lok Sabha Election : नांदेडमध्ये मतदाराने मतदान मशिन फोडलं, कर्मचाऱ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली. या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे ओरडत होता. मतदान केंद्रावर गृह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाचा दावा आहे.

14:05 PM (IST)  •  26 Apr 2024

Lok Sabha Election 2024 Phase 2 Polling Live: देशभरातील मतदानात महाराष्ट्रात सर्वात थंड प्रतिसाद, दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ 31.77 टक्के मतदान

Lok Sabha Election 2024 Phase 2 Polling Live: देशभरातील मतदानात महाराष्ट्रात सर्वात थंड प्रतिसाद, दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ 31.77 टक्के मतदान झाले आहे

दुपारी 1 पर्यंत मतदानाची आकडेवारी 

  • वर्धा – 32.32 टक्के 
  • अकोला -32.25 टक्के
  • अमरावती – 31.40 टक्के
  • बुलढाणा – 29.07 टक्के
  • हिंगोली – 30.46 टक्के
  • नांदेड - 32.93 टक्के
  • परभणी – 33.88 टक्के
  • यवतमाळ-वाशिम – 31.47 टक्के

13:07 PM (IST)  •  26 Apr 2024

Akola Election:  अकोल्यातील कृषीनगर भागातील मतदान केंद्रावर घोळ, वंचितच्या मतदारांची नाव जाणीवपूर्वक गहाळ केल्याचा गंभीर आरोप

Akola Election:  अकोल्यात सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झालीये. मतदार मतदानकेंद्रांवर मोठी गर्दी करतायेत. मात्र, अनेकांची मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांना आल्या पावली माघारी जावं लागतंये. अकोल्यातील कृषीनगर भागातील मतदान केंद्रांवर हा घोळ मोठ्या प्रमाणात दिसतोय. ((सकाळपासून शेकडो मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाला मुकलेयेत कृषीनगर भागातच प्रकाश आंबेडकराचं निवासस्थान आहेय. हा भाग त्यांचा गढ समजला जातोय. ))वंचितच्या मतदारांची नाव जाणीवपूर्वक मतदार यादीतून गहाळ केल्याचा गंभीर आरोप या मतदारांनी केलाय.

13:06 PM (IST)  •  26 Apr 2024

Parbhani Election:  एक महिन्यात अतिक्रमण काढू, जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन

Parbhani Election:  परभणीतील बलसा खुर्द गावातील ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बसला गावात दाखल झाले आणि ग्रामस्थांची समजूत काढत बहिष्कार मागे घेण्याचं आवाहन केलं. अतिक्रमण काढण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी बहिष्कार मागे घेतला आणि मतदान सुरु केलंय.

12:16 PM (IST)  •  26 Apr 2024

 Lok Sabha Election 2024 Phase 2 Polling Live: सकाळी 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील 8 जागांवर सरासरी 18.83 टक्के मतदान

 Lok Sabha Election 2024 Phase 2 Polling Live:  महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे.. पहिल्या दोन तासांची आकडेवारी समोर आली आहे..

सकाळी 11 पर्यंत मतदानाची आकडेवारी आणि तापमान

वर्धा – 18.35 टक्के ... तापमान - 36

अकोला -17.37 टक्के... तापमान - 36

अमरावती –17.73 टक्के... तापमान - 36

बुलढाणा – 17.92 टक्के...तापमान - 33

हिंगोली – 18.19टक्के...तापमान - 37

नांदेड - 20.85 टक्के...तापमान - 38

परभणी – 21.77 टक्के... तापमान - 37

यवतमाळ-वाशिम – 18.01 टक्के...तापमान - 36

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार
सर्वांना पेन्शन देण्याची सरकारची तयारी, EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, योजनांचं एकत्रीकरण करणार
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Weather Update: उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
Embed widget