Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Live Updates : सर्व 68 जागांचे कल हाती, भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत, क्षणाक्षणाचे अपटे्स
Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Live Updates : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती पडणार हे आज स्पष्ट होईल.

Background
Himachal Pradesh Election Results 2022 Live Updates : हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh Election) दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज (8 डिसेंबर) या राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Assembly Election Results) पार पडणार आहे. राज्याची सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात जाणार ते आज स्पष्ट होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे. त्यामुळे या राज्यात भाजप सत्ता राखणार की विरोधक त्यांच्याकडून सत्ता खेचून आणणार हे आज स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 68 जागांसाठी मतदान झाले होतं. राज्यात 75 टक्क्यांहून अधिक मतदान झालं होतं.
सुरुवातीला पोस्टल मतमोजणी होणार
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणी केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मनीष गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात 59 ठिकाणी उभारण्यात आलेल्या 68 केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होईल. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी केली जाईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएमची मतमोजणी होईल. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवार रिंगणात आहेत.
Himachal Pradesh Exit Poll
मतदानानंतर C VOTER ने ABP न्यूजसाठी सर्वेक्षण करत एक्झिट पोल केला आहे. या सर्वेक्षणाचा सॅम्पल साईज 30 हजार आहे. म्हणजे 68 विधानसभा मतदारसंघातील 30 हजार मतदारांचा कौल यामध्ये आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. गेल्या वेळी हिमाचल प्रदेशमध्ये 44 जागा घेत भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. यंदा भाजपला काही जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. 33 ते 41 जागा यंदा भाजप जिंकेल असा अंदाज आहे. असं असलं तरी सत्तेत भाजपच असेल असं चित्र या सर्व्हेतून दिसत आहे. तर काँग्रेसच्या मात्र जागा यंदा वाढताना दिसत आहेत. काँग्रेसला गेल्या वेळी 21 जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेस 24 ते 32 पर्यंत जागा जिंकू शकतो असा सर्व्हेचा अंदाज आहे. 'आप'ला मात्र इथे खातंही उघडता येणार नाही, असं सर्व्हेतून दिसत आहे.
एक्झिट पोल – हिमाचल प्रदेश 2022
कोणत्या पक्षाला किती जागा?
पक्ष 2017 निकाल एक्झिट पोल
भाजप 44 33-41
काँग्रेस 21 24-32
आप 00 00
इतर 00 04
Himachal Pradesh Results 2022 : काँग्रेसची मोठी आघाडी, 40 जागांवर पुढे तर भाजपला 25 जागांवर आघाडी
Himachal Pradesh Results 2022 : हिमाचल प्रदेश निवडणूक निकालात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेस 40 तर भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. इतर तीन जागांवर पुढे आहेत. आकडेवारीनुसार काँग्रेसने बहुमत मिळवलं आहे. मात्र घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची फळी शिमलात दाखल झाली आहे. विजयी आमदारांना मोहालीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे.




















