![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'रडीचा डाव खेळणं संजय राऊतांचा धंदा, चार जूनला दूध का दूध पाणी का पाणी होणार', गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Gulabrao Patil : रडीचा डाव खेळणं हा तर संजय राऊतांचा कायमचा धंदा आहे. एक्झिट पोलवर बोलायचं, ईव्हीएम बोलायचं, येत्या 4 तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होणार, असे गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे.
!['रडीचा डाव खेळणं संजय राऊतांचा धंदा, चार जूनला दूध का दूध पाणी का पाणी होणार', गुलाबराव पाटलांचा खोचक टोला Gulabrao Patil Slams Sanjay Raut on the Exit Poll Result 2024 Lok Sabha elections Maharashtra Politics Marathi News 'रडीचा डाव खेळणं संजय राऊतांचा धंदा, चार जूनला दूध का दूध पाणी का पाणी होणार', गुलाबराव पाटलांचा खोचक टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/02/c5191436686a869b3c6277398da8c4fb1717323599626923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll 2024) काल समोर आले. यात देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र महायुतीला राज्यात फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात महायुतीला (Mahayuti) 22 ते 26 जागा तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 23 ते 25 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील (Gulbarao Patil) यांनी प्रतिक्रिया दिला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर जोरदार टीका केली. यावरून गुलाबराव पाटलांनी संजय राउतांवर तोफ डागली आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, आदरणीय मोदी साहेब या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. जे एक्झिट पोल आपल्याला दिसत आहेत ते 400 च्या आसपास निकाल जातील अशा स्वरूपाचे दिसत आहेत. काही ठिकाणी अतितटीची लढत आहे. जरी शिंदे गटाच्या सात जागा दाखवत असल्या तरी मला विश्वास आहे की नऊ जागा आमच्या निवडून येतील. महाराष्ट्रात आपण जर पाहिले तर आम्हाला अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. आम्हाला गॅरंटी होती ती 40 ते 45 जागा आमच्या येतील. मात्र 35 जागांपर्यंत आम्ही जाऊ याची मला खात्री आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात चार जागा येतील, असे त्यांनी म्हटले आहे.
रडीचा डाव खेळणं हा संजय राऊतांचा धंदा
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोलवरून जोरदार टीका केली. गेल्या काही वर्षात ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल चुकीचे ठरत आहेत. भारतीय जनता पक्ष, गृह मंत्रालय आणि यंत्रणा कशा प्रकारे प्रभाव टाकत आहे हे सर्वांना माहिती आहे.कोणी कितीही आकडे लावले तरी एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 प्लस जागा मिळवेल, असे संजय राऊतांनी म्हटले. यावरून गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला. गुलाबराव पाटील म्हणाले की, रडीचा डाव खेळणं हा तर संजय राऊतांचा कायमचा धंदा आहे. एक्झिट पोलवर बोलायचं, ईव्हीएम बोलायचं, येत्या 4 तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होणार, असे त्यांनी म्हटले आहे.
जळगावच्या दोन्ही जागा आमच्याच निवडून येणार
एक्झिट पोलमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे या आघाडीवर आहेत. याबाबत गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या दोन्ही जागा या, आमच्याच निवडून येतील हे मी पूर्वीपासूनच सांगत होतो, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)