एक्स्प्लोर

गावचा सरपंच कोण होणार? संभाजीनगरात 16 सार्वत्रिक, 28 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान

Maharashtra Gram Panchayat Elections: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी 9 तालुक्यातील 68 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

Gram Panchayat Elections 2023: छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात (Maharashtra News) आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. शनिवारी म्हणजेच कालच मतदान (Voting) प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना निवडणूक विभागाच्या वतीने साहित्यांचे वाटप करून संबंधित गावाला पाठविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात देखील 16 सार्वत्रिक तर 28 ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी (Maharashtra Gram Panchayat Election 2023) आज मतदान होणार आहे. तर, सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत (NCP) झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत (Gram Panchayat Elections) निवडणूक होत असल्याने या निवडणुकीला महत्व आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी 9 तालुक्यातील 68 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात 16 सार्वत्रिक तर 28 ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे. या दोन्ही निवडणुकीच्या सरपंच पदासाठी 48 तर सदस्यपदासाठी 294 उमेदवार रिंगणात उतरले आहे. तर एकही ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकली नाही. तर, प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक विभागातील 4 कर्मचारी तैनात असणार आहेत. सोबतच पोलिसांचा बंदोबस्त देखील असणार आहे. 

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी नऊ तालुक्यात मतदान केंद्रे

  • फुलंब्री 1 
  • छत्रपती संभाजीनगर 6 
  • सोयगाव 5 
  • गंगापूर 18 
  • कन्नड 3 
  • खुलताबाद 13
  • सिल्लोड 6 
  • पैठण 7 
  • वैजापूरातील 9

कोणत्या जागेसाठी किती उमेदवार...

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 16 सार्वत्रिक आणि 28 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीतून सरपंच पदासाठी 48 तर सदस्यपदासाठी 294 उमेदवार आता रिंगणात उतरले आहेत. छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात या निवडणुका होणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी एक सरपंच आणि 39 सदस्य पदे रिक्त आहेत. सरपंच पदासाठी 5 तर सदस्यत्वासाठी 46 उमेदवार रिंगणात आहेत.             

महत्त्वाच्या इतर बातम्या :                                                            

Gram Panchayat Elections 2023 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, बारामतीत अजितदादांच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल, तर नागपूर, ठाणे, बीडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Thane Full Speech :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हल्लाबोल,व्हिडिओ लावून उद्धव ठाकरेंवर टीकाNaresh Mhaske Full Speech Thane Sabha: राज ठाकरेंनी माझ्यावर हात ठेवला नसता तर...Shrikant Shinde Full Speech : शिवसेना-मनसे फेव्हिकॉल का मजबूत जोड,  राज ठाकरेंसमोर जोरदार भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Embed widget