Goa Election : गोवा निवडणुकीसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, भाजपमधून आलेल्या मायकल लोबो यांना कटगुंटमधून उमेदवारी
Goa Assembly Election 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तिसरी यादी जाहीर केली असून आतापर्यंत एकूण 24 उमेदवार जाहीर केले आहेत.
पणजी : गोवा विधानसभेसाठी काँग्रेसने नऊ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून त्यात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री मायकेल लोबो यांना कलंगुटमधून तिकीट देण्यात आलं आहे. या आधीच्या दोन यादीत काँग्रेसने 15 उमेदवार जाहीर केले असून आज नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 24 उमेदवारांची नावं घोषित झाली आहेत.
बिचोलिम मतदारसंघातून मेघशाम राऊत यांना तर कलंगुट मतदारसंघातून मायकल लोबो यांना तिकीट देण्यात आलं आहे. दरम्यान, गोव्यात स्थानिक पातळीवर काँग्रेसने कोणासोबतही आघाडी न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न फसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या आधी गोव्यात शिवसेनेकडून काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा सुरू होती. पण काँग्रेसने अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याची शक्यता असून त्यासंबंधी आज या दोन पक्षांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसही यावेळी आपलं नशीब आजमावणार आहे. स्थानिक पक्षांनीही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- भाजपला उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी द्यावीच लागेल, दुसरा पर्याय नाही : संजय राऊत
- राष्ट्रवादी-शिवसेनेची गोवा विधानसभेसाठी आघाडी होणार का? दोन्ही पक्षांची उद्या गोव्यात बैठक
- Election 2022 : तुमच्या मनातून जात कधी जाणार?, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha