एक्स्प्लोर

Gadchiroli Lok Sabha Result 2024 : गडचिरोलीत 'मोदींची लाट' ओसरली, तिरंगी लढतीत कॉंग्रेसचे वर्चस्व!, लोकसभेचा निकाल एका क्लिकवर

Gadchiroli Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात अशोक नेटे, नामदेव किरसान आणि हितेश मडावी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. 

Gadchiroli Chimur Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ (Gadchiroli Chimur Lok Sabha) हा भारतीय राजकारणातील महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे. या मतदानाचा निकाल (Gadchiroli Chimur Lok Sabha Election Result 2024) लागला असून या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Political News) गडचिरोली चिमूर मतदारसंघातून कॉंग्रेसचे डॉ. नामदेव दासाराम किरसान हे 6,17,792 मतांनी विजयी झाले असून त्यांनी भाजपचे अशोक माधवराव नेटे यांचा पराभव केला आहे, नेटे यांना 476096 मत मिळाली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपने अशोक नेटे यांना तिकीट दिल्यानंतर येथे भाजपाचा विजय झाला. काँग्रेसने नामदेव उसेंडी यांना तिकीट दिले होते, मात्र त्यावेळी ते विजयी होऊ शकले नाहीत. मात्र यंदा मोदींची लाट ओसरल्याचं चित्र दिसून येतंय.

गडचिरोली लोकसभा निकाल 2024 (Gadchiroli Lok Sabha Election Result 2024) 

उमेदवाराचे नाव - पक्ष  

डॉ. नामदेव दासाराम किरसान - 617792    कॉंग्रेस - विजयी

अशोक माधवराव नेटे - 476096  भाजप - पराभूत

हितेश मडावी - 15922- वंचित बहुजन - पराभूत

सर्वाधिक मतदान यंदा गडचिरोलीमध्ये

गडचिरोली चिमूर (Gadchiroli Chimur) मतदारसंघ हा विदर्भाचं शेवटचं टोक, आदिवासीबहुल, आणि नक्षलग्रस्त भाग अशी या मतदारसंघाची ओळख आहे. 2024 मध्ये मतदारराजाने कोणाच्या पारड्यात मत टाकलंय हे चित्र 4 जूनला स्पष्ट झालं आहे. या मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी यशस्वीपणे निवडणूक झाली होती. त्यावेळी 71.67 टक्के मतदान झाले होते. यंदा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील 2024 च्या उमेदवारांच्या यादीनुसार भारतीय जनता पक्षाकडून अशोक माधवराव नेटे (Ashok Nete), भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून डॉ. नामदेव दासाराम किरसान (Namdev Kirsan) आणि वंचित बहुजन आघाडीचे हितेश पांडुरंग मडावी (Hitesh Madavi) हे प्रमुख उमेदवार होते. गडचिरोली मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून हा 48 मतदारसंघापैकी एक आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली, आरमोरी, ब्रह्मपुरी, चिमूर आणि आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यंदा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 71.67 टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले आहे. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 64.84 टक्के एवढे मतदान झाले होते. 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

आमगाव - सहसराम कोरोटे, काँग्रेस
आरमोरी- कृष्णा गजबे, भाजपा
गडचिरोली- देवराव कोळी, भाजपा
अहेरी- धर्मरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी कॉंग्रेस
ब्रम्हपुरी - विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस
चिमूर-किर्तीकुमार (बंटी) भांगडिया - भाजपा 

2019 सालचा निवडणूक निकाल - (Gadchiroli Lok Sabha Constituency 2019 Result)

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

वर्ष- 2019 : अशोक नेते (विजयी उमेदवार- भाजप) 45.05% मतं

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे अशोक महादेवराव नेटे 5,17,722 मते मिळवून विजयी झाले होते.

तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ. नामदेव दल्लुजी उसंदी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 

विजयाचा फरक: 77,336 मते.

वर्ष- 2014 : अशोक नेटे (विजयी उमेदवार- भाजप) 52.18% मतं

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे अशोक महादेवराव नेटे 5,35,616 मते मिळवून विजयी झाले होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ. नामदेव दल्लुजी उसंदी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

विजयाचा फरक : 2,36,640 मते.

या मतदारसंघाचे मागील लोकसभा निवडणुकीचे निकाल (लोकसभा 2019)

  • अशोक महादेवराव नेटे           भाजपा                          5,17,722         46.52%
  • डॉ. नामदेव दल्लुजी उसंदी      भारतीय राष्ट्रीय काँग्रेस    4,40,386         39.57%
  • डॉ. रमेशुमार बाबुजा गजबे     वंचित बहुजन आघाडी     1,10,736         9.95%
  • हरिचंद्र नौजी मंगम बहुजन     समाज पक्ष                     28,006            2.52%
  • देताना मोना नन्नावा               अपोल पार्टी                    16,090            1.45%

(लोकसभा 2014)

1 अशोक महादेवराव नेटे भाजपा - 5,35,616 
2 डॉ. नामदेव दल्लुजी उसंदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 2,98,976
3 रामराव गोविंदा नन्नावा बहुजन समाज पक्ष - 66,877 
4 डॉ. गजबे रामेशुमार बाबुजा आम आदमी पार्टी - 44,192
5 नामदेव आनंदराव कॅनकेक भारतीय कम्युनिस्ट पक्ष- 22,510                                                                                                   

(लोकसभा 2009)

1 कोवेस मारतोराव सिनूजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 3,21,349 
2 अशोक महादेवराव नेटे भाजपा - 2,92,645 
3 आत्रम राजे सत्यवनराव बहुजन समाज पक्ष -1,35,500 
4 दिनेश तुकाराम मदावी अपक्ष -25,857 
5 नामदेव आनंदराव कॅनकेक भारतीय कम्युनिस्ट पक्ष - 22,999 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget