एक्स्प्लोर
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : भाजपला शेतकरी असंतोषाचा फटका
सध्याच्या आकडेवारीनुसार या आठपैकी 5 जागी भाजप तर 3 जागी काँग्रेस आघाडीवर आहे. मंदसौर, मल्हारगड, जावरा, सुवासरा, गरोठ, मानसा, नीमच, जवाद या मतदारसंघात भाजपला अटीतटीची लढत द्यावी लागत आहे. गेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने जिंकलेल्या या जागांवर भाजपला कमी मतं मिळताना दिसत आहेत.
![मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : भाजपला शेतकरी असंतोषाचा फटका Former attack in Mandsaur MP, Effect on Assembly Result मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : भाजपला शेतकरी असंतोषाचा फटका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/06111128/Mandsaur-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भोपाळ : मध्यप्रदेशात भाजप सरकारला अटीतटीची लढत द्यावी लागत आहे. त्याचं एक कारण शेतकऱ्यांचा असंतोष बोललं जातं आहे. शेतकरी आंदोलन आणि त्यावेळी झालेली हिंसा यामुळे मध्यप्रदेशातील मंदसौर चर्चेत आलं होतं. इथे झालेल्या गोळीबारात 6 शेतकरी मृत्युमुखी सुद्धा पडले होते. या आंदोलनाची तीव्रता अनुभवलेले 8 मतदारसंघ होते. त्यातले ७ भाजपकडे तर 1 काँग्रेसकडे होता.
सध्याच्या आकडेवारीनुसार या आठपैकी 5 जागी भाजप तर 3 जागी काँग्रेस आघाडीवर आहे. मंदसौर, मल्हारगड, जावरा, सुवासरा, गरोठ, मानसा, नीमच, जवाद या मतदारसंघात भाजपला अटीतटीची लढत द्यावी लागत आहे. गेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने जिंकलेल्या या जागांवर भाजपला कमी मतं मिळताना दिसत आहेत.
मध्य प्रदेश विधानसभेवर कोणाचा झेंडा हे आज जाहीर होईल. निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं.
मतदानानंतर केलेल्या एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहे.
या निवडणुकीत एकूण 5,04,95,251 मतदारांपैकी 3,78,52,213 मतदारांनी म्हणजेच 75.05 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. आज 1,094 अपक्ष उमेदवारांसह एकूण 2,899 उमेदवारांच्या भवितव्याच्या फैसला होणार आहे. यामध्ये 2,644 पुरुष, 250 महिला आणि पाच तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे.
मध्य प्रदेश विधानसभेवर कोणाचा झेंडा याचा फैसला आज होईल. निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)