एक्स्प्लोर

राहुल गांधींच्या संविधान संमेलनाबाबत भाजपकडून फेक नॅरेटीव्ह, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा आरोप, माध्यमांना आवाहन

Vidhan Sabha Election 2024 : संविधान संमेलनाबाबत भाजपकडून पसरवल्या जाणारे फेक नॅरेटीव्ह आहे. यावर माध्यमांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले आहे.  

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या रेशीमबागेत संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील भट सभागृहात उद्या, 6 नोव्हेंबरला  11 ते 2 दरम्यान संविधान सन्मान संमेलन होणार असून राहुल गांधी त्यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहे. दरम्यान उद्या होणा-या संमेलनात माध्यमांना केवळ लिंक देणार.असून .. कार्यक्रमस्थानी माध्यमांना प्रवेश दिला जाणार नाही. कार्यक्रमाचे लाईव्ह फीड (LIVE Feed) फीड माध्यमांना काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया हॅंडल्स आणि युट्युबवरून मिळणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात माध्यमांना बंदी आहे. असे सांगण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र या भाजपकडून पसरवल्या जाणा-या फेक नॅरेटीव्ह आहे. यावर माध्यमांनी विश्वास ठेवू नये. असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केले आहे.  

माध्यमांची खरी भिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. त्यामुळे गेल्या 11 वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकारांच्या प्रश्नांचा सामना करण्याचे धाडस त्यांच्यात नाही. याउलट राहुल गांधींनी शेकडो पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यामुळे भाजपाकडून पसरवल्या जाणा-या या अफवांवर माध्यमांनी विश्वास ठेवू नये. असे आवाहनही अतुल लोंढे यांनी केले आहे. 

माध्यमांची खरी भिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना- अतुल लोंढे 

राहुल गांधी यांच्या नागपुरात होत असलेल्या संविधान सन्मान संमेलनात माध्यमांना केवळ लिंक देणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान कार्यक्रमस्थानी माध्यमांना प्रवेशाबाबत स्पष्टता नसल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या. अशातच काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी स्पष्टोक्ती देत यावर भाष्य केलं आहे. नागपुरातील भट सभागृहात उद्या (6 नोव्हेंबर) 11 ते 2 दरम्यान संविधान सन्मान संमेलन होणार असून राहुल गांधी त्यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहे. ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे या संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहे. तिथे राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अनेक बुद्धिजीवी उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी बाराच्या सुमारास नागपुरात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी या संमेलनात सहभागी होतील. मात्र त्यापूर्वी ते दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन वंदन करणार आहे.

संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच- बंटी शेळके

"संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच" असा मोठा दावा मध्य नागपूर मधील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी केला आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रअंतर्गत गल्लीबोळात फिरून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी त्यांचा प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय मध्य नागपूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत येतो. त्या ठिकाणी बंटी शेळके काँग्रेसचे उमेदवार असून यंदा भाजपच्या आणि संघाच्या गडात आम्ही आमचा (काँग्रेस) झेंडा रोवू, असं बंटी शेळके यांचा दावा आहे. आता मध्य नागपूर मोहन भागवत यांचा गड राहणार नाही, तर राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा गड बनवून दाखवू, असं ही बंटी शेळके म्हणाले. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीय आणि धार्मिक द्वेष पसरून समाजाला विभाजित केलं असलं, तरी मध्य नागपूरची जनता तो डाव यंदा हाणून पाडेल, असा विश्वासही बंटी शेळके यांनी व्यक्त केला आहे. 

मध्य नागपुरात शेळके यांचा लढा भाजप उमेदवार प्रवीण दटके यांच्या विरोधात आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरोधात जोरदार टीका करणारे बंटी शेळके त्यांचे प्रतिस्पर्धी प्रवीण दटके यांच्या बद्दल मात्र ते माझे मोठे बंधू असून आम्ही त्यांच्या विरोधात प्रेमाने (मोहब्बत की दुकान) निवडणूक लढवू असे म्हणत आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget