एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसशी संबंधित 687 पेजेस फेसबुकने हटवले, खोटे मेसेज व्हायरल केल्याने कारवाई
एखाद्या देशातील महत्त्वाच्या राजकीय पक्षाविरोधात फेसबुकने क्वचितच अशी कारवाई केली असेल. फेसबुक काँग्रेसचे जवळपास 52 लाख फॉलोअर्स आहेत.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना फेसबुकने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. काँग्रेसशी संबंधित काही व्यक्तींची तब्बल 687 फेसबुक अकाऊण्ट्स किंवा पेजेस फेसबुकने बंद केली आहेत.
या पेजेसवरुन खोटी माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. त्यामुळे हे पेजेस बंद केल्याचं फेसबुकने म्हटलं आहे. coordinated inauthentic behaviour (समन्वय साधून केलेले अप्रामाणिक वर्तन) असं कारण फेसबुकने सांगितलं आहे.
संबंधित व्यक्ती काँग्रेस आयटी सेलशी निगडीत असल्याचं फेसबुकच्या सायबर सिक्युरिटी पॉलिसीचे प्रमुख नाथानिएल ग्लेशियर यांनी स्पष्ट केलं. एखाद्या देशातील महत्त्वाच्या राजकीय पक्षाविरोधात फेसबुकने क्वचितच अशी कारवाई केली असेल. फेसबुक काँग्रेसचे जवळपास 52 लाख फॉलोअर्स आहेत.
अवघ्या दहा दिवसात लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरु होणार आहे. फेसबुकच्या या कारवाईमुळे ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement