एक्स्प्लोर

5 State Election Results 2022 : दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह 'हे' दिग्गज पिछाडीवर, योगींची मात्र मोठी आघाडी

5 State Election Results 2022 LIVE: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे सुरुवातीचे कल आता हाती आले असून चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागलं आहे. अनेक दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.

5 State Election Results 2022 LIVE: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये पंजाब (Punjab Election Results), गोवा (Goa Election Results), उत्तरप्रदेश (Uttar Pradesh Election Results), उत्तराखंड (Uttarakhand Election Results) आणि मणिपूर (Manipur Election Results) या पाच राज्यांचा समावेश आहे. सुरुवातीचे कल आता हाती आले असून चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागलं आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये अनेक दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. यात तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. 

यामध्ये पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी (charanjit singh Channi), उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी (Pushkarsingh Dhami) हे मुख्यमंत्री सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत. गोव्यामध्ये प्रमोद सावंत हे देखील दोन राऊंडपर्यंत पिछाडीवर होते. गोव्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील पिछाडीवर असल्याचं दिसतंय. मडगाव काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत  2800 मतांनी आघाडीवर आहेत तर भाजपचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर पिछाडीवर आहेत. गोव्यात सध्याच्या कलानुसार भाजप 18, काँग्रेस 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 5, अपक्ष 2, गोवा फॉरवर्ड 1 आणि आप 1 जागेवर आघाडीवर आहे. उत्पल पर्रीकर हे देखील पिछाडीवर असल्याची माहिती आहे. 

पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी  यांच्यासह कॅप्टन अमरिंदर सिंह, सुखबीर सिंग बादल, प्रकाश सिंह बादल,  नवजोत सिंह सिद्धू हे पंजाबच्या राजकारणातील सगळे दिग्गज सध्या पिछाडीवर आहेत. 

उत्तरप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 240 च्या वर जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पार्टी 111 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आपनं चांगलीच मुसंडी मारल्याचं सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय. आप 88 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या काँग्रेस 15 तर भाजप 22 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय.

उत्तराखंडमध्ये 43 पेक्षा जास्त जागांवर भाजप तर काँग्रेस 23 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस आतापर्यंतच्या कलांमध्ये आघाडीवर असल्याचं दिसतंय.

या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स 

https://marathi.abplive.com/live-tv 

https://twitter.com/abpmajhatv 

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

संबंधित बातम्या

Share Market : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी सेन्सेक्स 1000ने वधारला, निफ्टी देखील 321 अंकांनी वर

Goa Election Result : गोव्यात चुरस वाढली! सुरुवातीचे सर्व कल हाती; काँग्रेस-भाजपमध्ये घासून सामना, उत्पल पर्रीकर पिछाडीवर

Election Result 2022 : सुरुवातीच्या कलांमध्ये यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाबमध्ये आप आघाडीवर तर गोव्यात घासून!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Diwali : दिवाळी निमित्त मुस्लिम समाजासोबत फराळाचे आयोजन, खासदार शाहू महाराज उपस्थित
Yashomati Thakur : यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडेंनी साजरी केली भाऊबीज
Chitra Wagh, Prasad Lad Bhaubeej : चित्रा वाघ यांची भाऊबीज, म्हणाल्या 'नातं रक्ताच्या पलीकडचं'
Shaniwar Wada Row: 'निवडणुका आल्या की दंगली पेटवतात', Thackeray गटाचा BJP वर थेट हल्ला
Mahayuti Politics: 'आम्ही एकला चलो रे', भरत गोगावलेंचा Sunil Tatkare यांना नाव न घेता इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली!
राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली!
Bihar Election 2025: बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया
बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया
Video: गळ्यात झंडूच्या फुलाचा हार, डोळ्यावर गाॅगल अन् चक्क बिकिनी घालून परदेशी महिलेची गंगेत डुबकी; ऋषिकेशमधील व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ
Video: गळ्यात झंडूच्या फुलाचा हार, डोळ्यावर गाॅगल अन् चक्क बिकिनी घालून परदेशी महिलेची गंगेत डुबकी; ऋषिकेशमधील व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ
Thackeray bhaubeej: ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी
ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी
Embed widget