एक्स्प्लोर

Election Commission : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिपाणीमुळे फटका,चिन्हाबाबत कोणता निर्णय घेणार? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...

Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि.28) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी संबोधित केलं.

Election Commission Press Conference, Mumbai : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पिपाणी या चिन्हामुळे फटका बसल्याच आरोप सातत्याने करण्यात येत होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी असा गोंधळ होऊ नये याबाबत कोणता निर्णय घेणार? असा सवाल निवडणूक आयोगाला पत्रकारांनी विचारला होता. याबाबत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी भाष्य केलं आहे. 

"चिन्हबाबत ऑर्डर आम्ही दिली आहे. त्याला देखील कोर्टात चॅलेंज करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी यावर बोलणार नाही", अशी प्रतिक्रिया राजीव कुमार यांनी दिली. केंद्रीय निवडणूक आयोग गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर आयोगाने महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन दिवस महाराष्ट्रातील प्रशासनाचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केलं. 

मोबाईल सोबत असल्यामुळे अनेकांना मतदान करता आलं नव्हतं

राजीव कुमार म्हणाले, अन्य उत्सवांप्रमाणे महाराष्ट्राची जनता निवडणुकीचा उत्सवही देखील स्वागत करेल. मागील 2 दिवस आम्ही सगळ्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पक्षासोबत आमची चर्चा झाली. बीएसपी, एनसीपी, सारख्या 11 पक्षांसोबत चर्चा झाली. दिवाळी आणि छट पूजा लोकांचे सण विचारात घेऊन  निवडणुकीच्या तारखा जाहीर कराव्यात अशी या पक्षांनी विनंती राजकीय पक्षांनी केली. पक्षांनी अशी देखील विनंती केली की, लोकसभा निवडणुकीत मोबाईलसोबत असल्यामुळे अनेकांना मतदान करता आलं नव्हतं. त्यामुळे विधानसभेला याचा विचार व्हावा. मतदानासाठी जाताना मोबाईल परवानगी नाही. माञ सोबत जर मतदार मोबाईल घेऊन गेला असेल तर तो ठेवण्याची व्यवस्था करावी. 

पैशाच्या गैरवापर थांबवण्याबाबतही राजकीय पक्षांनी भाष्य केलं

पुढे बोलताना राजीव कुमार म्हणाले, फेक न्यूज वाढत आहे त्याचा बंदोबस्त करण्याबाबत देखील सांगण्यात आलं. शिवाय निवडणुकीत होत असलेल्या पैशाच्या गैरवापर थांबवण्याबाबतही राजकीय पक्षांनी भाष्य केलं. सध्या महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री 4.64  कोटी आहेत.  थर्ड जेंडरचे 5997, दिव्यांग 6.32 लाख  मतदार आहेत. पहिल्यांदा मतदान करणारे मतदार 19.48 लाख मतदार असणार आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये वाढ झाली आहे. राज्यांत एकूण 1 लाख 186 पोलिंग स्टेशन असणार आहेत. त्यातील शहरी भागात 42 हजार 585 तर ग्रामीण भागात - 57 हजार 601 असतील. निवडणुकीवेळी काही ठिकाणी तरूण अधिकारी बूथ मॅनेज करतील, असे 350 बूथ असतील. 

एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल. जो सभेसाठी मैदान मिळण्यासाठी अर्ज करेल त्याला मैदान देण्याची संधी दिली जाईल.

Sharad Pawar : पुण्याचं वैशिष्ट्य विचारलं तर लोक सांगतात 'कोयता गँग', शरद पवारांचा राज्य सरकारवर निशाणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 28 Sep 2024 : 7PM : ABP MajhaAjit Pawar Full Speech Tumsar :  राज्याची तिजोरी माझ्याकडे...अजितदादांचं धडाकेबाज भाषणTop 25 : टॉप 25 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 07 PM : 28 September 2024 : ABP MajhaRaj Thackeray On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
Embed widget