एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी 'सीव्हिजील' अॅप लाँच
आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची आता सामान्य नागरिकही या अप्लिकेशनच्या माध्यमाने तक्रार करु शकणार आहे. विशेष म्हणजे तक्रारीवरुन काय कारवाई केली जाईल हे तक्रारदाराला 100 मिनिटात कळविणे आयोगावर बंधनकारक सुद्धा आहे.
मुंबई : आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने 'सीव्हिजील' अॅप्लिकेशन लाँच केले आहे. आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची आता सामान्य नागरिकही या अप्लिकेशनच्या माध्यमाने तक्रार करु शकणार आहे. विशेष म्हणजे तक्रारीवरुन काय कारवाई केली जाईल हे तक्रारदाराला 100 मिनिटात कळविणे आयोगावर बंधनकारक सुद्धा आहे.
देशातील लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं आहे. 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाने देशभरात आचारसंहिता लागु झाल्याची घोषणा केली आहे. 11 एप्रिल ते 19 मे रोजीदरम्यान सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 मे रोजी निकाल लागणार आहे. रविवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
या निवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये, शिवाय उल्लंघन झाल्यास तात्काळ कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोग अत्यंत चांगल्या उपाययोजना राबवणार आहे. त्यासाठी आयोगाने सीव्हिजील नावाचे अॅप्लिकेशन आणले आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमाने तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली आहे.
या अॅप्लिकेशनमार्फत केलीली तक्रार सुरुवातीला जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये जाईल, त्यानंतर जीआयएसने संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचेल. अधिकाऱ्याला कारवाई करण्यासंबंधी फक्त 100 मिनिट असणार. आपण काय कारवाई करणार आहोत, याची माहिती तक्रारदाराला देणं अधिकाऱ्याला बंधनकारक असणार आहे. हे अप्लिकेशन तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु शकतात.
या गोष्टींवर असणार निवडणूक आयोगाची करडी नजर
-फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील प्रचारावर, पेड न्यूजवर निवडणूक आयोगाची करडी नजर
- इव्हीएमची मूव्हमेंट पाहण्यासाठी जीपीएसचा वापर केला जाईल
- मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येणार
- निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबात सामान्य नागरिकही आयोगाकडे थेट तक्रार करु शकणार, अॅपवरील तक्रारदाराचं नाव गुप्त राहणार, 100 मिनिटांच्या आत अशा तक्रारींना प्रतिसाद आयोगाचे अधिकारी देणार.
- मतदानाच्या 48 तास आगोदर लाऊड स्पीकरची परवानगी नसेल
- रात्री दहानंतर प्रचाराला मुभा नाही, रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement