एक्स्प्लोर
Advertisement
'अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलाय का?' या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लीन चिट
काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील वडमेर येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांबद्दल बोलताना म्हणाले होते की, "भारताकडे असलेले अणुबॉम्ब दिवाळीमध्ये वापरण्यासाठी ठेवलेले नाहीत."
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील वडमेर येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांबद्दल बोलताना म्हणाले होते की, "भारताकडे असलेले अणुबॉम्ब दिवाळीमध्ये वापरण्यासाठी ठेवलेले नाहीत". मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. परंतु मोदींचे हे वक्तव्य आदर्श आचासंहितेचे उल्लंघन नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाने मोदींना क्लीन चिट दिली आहे.
नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या विविध विधानांवरुन काँग्रेसने मोदींविरोधात एकूण 11 तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी 3 तक्रारींचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. तीनही वेळा निवडणूक आयोगाने मोदींना क्लीन चिट दिलेली आहे.
VIDEO | आमचा अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेला नाही, पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा | एबीपी माझा
काँग्रेसने मोदींविरोधात तक्रार करताना म्हटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार प्रचारादरम्यान भारतीय सैन्याचा उल्लेख करत आहेत, सैनिकांच्या नावाने मत मागत आहेत. आता तर मोदींनी अणुबॉम्बचादेखील उल्लेख केला आहे. सशस्त्र दलाबाबत विधानं करुन मोदी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत".
21 एप्रिल रोजीच्या प्रचारसभेत मोदी म्हणाले होते की, "भारताने पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरणे आता सोडून दिले आहे. नाहीतर पूर्वी दररोज आमच्याकडे न्युक्लिअर बटन आहे, या गोष्टीचा पाकिस्तानकडून पुनरुच्चार होत होता. माध्यमं त्यावेळी हेडलाईन लिहायची की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. तर मग आमच्याकडे असलेला अणुबॉम्ब आम्ही दिवाळीसाठी ठेवला आहे का?" असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला.
VIDEO | ..तर भारत पाकिस्तानवर 20 अणुबॉम्ब टाकेल ! | एबीपी माझा
वाचा : भारताकडील अणुबॉम्ब दिवाळीसाठी राखून ठेवलेला नाही : नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा
पाकिस्तानने त्यांचा अणुबॉम्ब ईदसाठी नाही ठेवलाय, मेहबुबा मुफ्ती यांचा मोदींना टोला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement