एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा समावेश, निवडणुक आयोगाची प्रात्यक्षिक, मतमोजणीवर घेतले जाणारे आक्षेप दूर होणार
अशा पद्धतीने मतदारला मतदान कुणाला केले आणि कुणाला झाले याचा पुरावा बघायला मिळणार आहे.
पिंपरी : मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केलं, त्यालाच ते मिळालं की नाही, याची माहिती आतापर्यंत समजत नव्हती. मात्र आता यापुढे तुम्ही केलेलं मतदान, त्याच उमेदवाराला मिळालं आहे की नाही, हे समजणार आहे. आगामी निवडणुकांसाठी आता व्हीव्हीपॅट मशीनचा समावेश झाला आहे.
ईव्हीएमद्वारे निवडणुकांबद्दलच्या सर्व शंका कुशंका दूर करण्याचे प्रयत्न निवडणूक आयोगाने सुरू केले आहे. त्यामुळे मतमोजणीवर घेतले जाणारे आक्षेप ही आता दूर होणार आहेत. व्हीव्हीपॅट ही पारदर्शक प्रणाली असून याच्या माध्यमातून निवडणुकीत मतदाराने कोणाला मतदान केले हे मतदाराला माहीत होणार आहे. तर मतमोजणीवर वाद निर्माण झाल्यास निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मदतीने निकाल निश्चित करणे शक्य होणार आहे. आज पुण्यात व्हीवहीपेट कार्यप्रणाली चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आली.
VIDEO | आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा समावेश, निवडणुक आयोगाची प्रात्यक्षिक | पिंपरी | एबीपी माझा
व्हीव्हीपॅट मशिन काम कसं करतं?
व्हीव्हीपॅट अर्थात व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. मतदार जेव्हा एखाद्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी त्याच्या चिन्हापुढील बटण दाबतो, त्यावेळी व्हीव्हीपॅट मशिनवरील स्क्रीनवर ज्या उमेदवारच्या नावापुढील बटण दाबले गेले, त्याचे नाव आणि चिन्हाची प्रिंट निघते. मतदाराला स्क्रीनवर काही सेकंद ही प्रिंट स्पष्ट दिसते आणि मग ही प्रिंट व्हीव्हीपॅट मशिनमधील डब्यात जाऊन पडते.
अशा पद्धतीने मतदारला मतदान कुणाला केले आणि कुणाला झाले याचा पुरावा बघायला मिळणार आहे.
ईव्हीएमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे महत्त्वपूर्ण निर्णय
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची (ईव्हीएम) विश्वासार्हता वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट (व्होटर-व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रेल) मशीन्सचा वापर करणे अनिवार्य केले आहे. तसेच ईव्हीम मशीनवर उमेदवारांची छायाचित्रे उपलब्ध करणे, मशीनवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
व्हीव्हीपॅट मशीन्सचा सार्वत्रिक वापर करण्याची यंदाची पहिलीच वेळ आहे. तसेच इव्हीएम हॅक होऊ नये, मशीनसोबत छेडछाड होऊ नये, ईव्हीएम मशीनवर निवडणूक आयोगाचा संपूर्ण ताबा रहावा यासाठी ईव्हीएम मशीन्सवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. आगामी मतदानावेळी ईव्हीएममध्ये करण्यात आलेला सर्वात मोठा बदल म्हणजे, सर्व इव्हीएम मशीन्सवर उमेदवारांचे छायाचित्रही पाहायला मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement