एक्स्प्लोर

Eknath Shinde On Najeeb Mulla: नजीब मुल्ला आपला कोकणी मराठी माणूस, नावावर जाऊ नका; एकनाथ शिंदेंचं जाहीर सभेत आवाहन

Eknath Shinde On Najib Mulla: मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली.

Eknath Shinde On Najib Mulla ठाणे: ठाणे जिल्हा म्हणजे महायुतीचा बालेकिल्ला आहे. आनंद दिघे यांनी कळव्या मुंब्रावर खूप प्रेम केलं. लाडक्या बहिणींनो आपला लाडका भाऊ नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांना मतदान करायचं आहे. नजीब मुल्ला हा कोकणी मराठी माणूस आहे. त्यांच्या नावावर जाऊ नका, असं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळे ते बोलत होते.

ठाणे मनपाकडून साडे तीन हजार कोटींचा निधी दिला, मात्र तरीही कळवा-मुंब्राला निधी देत नाही, अशी ओरड येथील आमदार सतत करत राहिले. पहिल्यांदा नजीबनेच या मतदारसंघातील घराघरात जाऊन त्यांचा प्रचार केला. आज नजीब मुल्ला यांना त्याचा पश्चाताप होतो आहे. त्यामुळे कळवा मुंब्रा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा तर बंटीची घंटी वाजवून नजीब मुल्ला यांना मतदान करा, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

नजीब आपला पोरगा आहे-  एकनाथ शिंदे

नजीबचे घड्याळ आहे, आपला आहे तो, नजीब आपला पोरगा आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस , अजित पवार हे नजीबसोबत आहे, मग आणखी काय हवंय?एवढे वर्ष सहन केलं आता करायचं नाही. नजीब कळवा मुंब्राचा विकास करेल ही जबाबदारी मी घेतो.  नजीब तू  निवडून आल्यावर, सगळ्यांना मदत करायची, मदतीला धावून जायचं, असं एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत सांगितलं. कळवा मुंब्रामध्ये युतीचे मतदार राहतात. नजीब मुल्लाने महापालिका सभा गाजवली. त्यामुळे आता विधासभा गाजवायची आहे, त्यासाठी त्याला विधानसभेत पाठवा. कळवा मुंब्रा मतदारसंघात 3 वेळा एक ढोंग जिंकला, अशी टीका एकनाथ शिंदेंनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. 

विजेच्या बिलात 30% टक्के सवलत देण्याचा निर्णय घेणार- एकनाथ शिंदे

तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात 25 हजार बहिणींची भरती करणार आहे. वाकड्या नजरेने बघणाऱ्याला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही. तसेच 25 लाख रोजगार निर्माण करणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. महायुतीचं सरकार आल्यास विजेच्या बिलात 30% टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. नजीबला निधी किती मिळाला?, 3 महिन्यात 200 कोटी...मग 5 वर्षात किती मिळेल? आमदारांना निधी मिळत नव्हतं, म्हणून आम्ही सरकार बनवलं. आमच्या प्रत्येक आमदाराला 2 ते 3 हजार कोटी विकास करण्यासाठी फंड दिला, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. 

नजीब मुल्ला हा कोकणी मराठी माणूस- एकनाथ शिंदे

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
Kolhapur Uttar Vidhan Sabha :  बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Bag Checking : उद्धव ठाकरेनंतर आदित्य ठाकरे यांच्याही बॅगांची तपासणीABP Majha Headlines :  2 PM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRahul Gandhi Speech Nandurbar | महिलांना 3 हजार, बसचा प्रवासही मोफत राहुल गांधींची मोठी घोषणाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 2 PM : 14 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
Kolhapur Uttar Vidhan Sabha :  बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा
मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा
Rahul Gandhi : आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल
Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Embed widget