मोठी बातमी! एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, 3 वाचाळवीर मंत्र्यांना नारळ देणार, शिवसेनेत घडामोडींना वेग
शिवसेना पक्षात घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिपद मिळावं यासाठी नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत आहेत. येत्या 5 डिसेंबर रोजी नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.
मुंबई : राज्यात लवकरच नव्या सरकारची स्थापना होणार आहे. त्यासाठी महायुतीकडून तयारी केली जात आहे. मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला काही महत्त्वाची मंत्रिपदे दिली जातील. आता मुख्यमंत्रिपदासाठीचं नाव जवळजवळ निश्चितच झाल्यामुळे आता नव्या सरकारमध्ये कोण-कोण मंत्री असणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे. असे असतानाच आता शिवसेना (Shivsena) पक्षात मंत्रिपदासाठी लॉबिंग चालू झाले आहे. सोबतच नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्यांबाबत गुप्तता पाळली जात आहे.
मंत्रिपद मिळावं यासाठी लॉबिंग
महायुतीमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला चांगलाच वेग आला आहे. महायुतीतील घटकपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या रोज बैठका होत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही मंत्रिपदासाठी अनेक नेते लॉबिंग करत आहेत. शपथविधीसाठी आता 36 तासांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत. महत्त्वाचं खात आपल्या पदरात पडावं यासाठी शिवसेनेचे नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षातील निवडक ज्येष्ठ मंत्र्यांना उद्या (5 नोव्हेंबर) मुंबईत राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांमधील नाराजी टाळता यावी यासाठी मंत्रिपदाबाबत गुप्तता पाळली जात आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना मिळणार नारळ
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षातून सात आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांना उद्या मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी एकनाथ शिंदे काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. याआधीच्या सरकारमध्ये ज्या नेत्यांना मंत्रिपद दिलं होतं, अशा तीन नेत्यांना यावेळी मंत्रिपद दिलं जाणार आहे. म्हणजेच मंत्री राहिलेल्या तीन बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार आहे. त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवीर मंत्र्यांना एकनाथ शिंदे नारळ देण्याची शक्यता आहे.
1500 पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान, मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. येथे महायूतीच्या शपतविधीसाठी मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शपथविधीदरम्यान 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :