एक्स्प्लोर

Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसमोर एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली; अमित शाहांसमोर मोठी मागणी केली!

Eknath Shinde Amit Shah Meeting Delhi: अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

Eknath Shinde Delhi Meeting: राज्याच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी बैठक झाली.  अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रि‍पदाबाबत देखील चर्चा झाली. 

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रि‍पदासह गृह आणि अर्थ हे खातं भाजपकडे जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र अमित शाह यांच्यासोबतच्या झालेल्या कालच्या दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर गुगली टाकत अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी केली. 

एकनाथ शिंदेंनी टाकली गुगली-

एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली. त्यामुळे गृह खातं भाजप एकनाथ शिंदेंना देणार का?, हे आगामी दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. 

मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला-

महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 10 ते 12 आणि राष्ट्रवादीला 7-9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

मुंबईत आज पुन्हा महायुतीची बैठक

दरम्यान आज मुंबईत महायुतीची बैठक होणार आहे. शिंदे, फडणवीस, अजित पवार या बैठकीला उपस्थित असतील. अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा होणार आहे.  तर येत्या दोन दिवसांत निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे लवकरच स्पष्ट होईल. 

ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार-

काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट करुन तरुण चेहऱ्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात युवा आमदारांना जास्त संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढील निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठी आतापासून तयारी केली जाणार आहे. त्यामुळे 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही, असं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे.

संबंधित बातमी:

Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले

Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Embed widget