मुंबईत महायुतीली किती जागा मिळणार? एकनाथ शिंदेंनी सांगितला आकडा, ठाकरे बंधुंवर साधला थेट निशाणा
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे
Eknath Shinde : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. कारण या ठिकाणी ठाकरे बंधुंनी युती केली आहे. तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र लढत आहेत. अशातच आज वरळीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा रोड शो झाला. यामध्ये त्यांनी ठाकरे बुंधुंवर जोरदार निशाणा साधला. महायुतीला विजयी करायचा निश्चय मुंबईकरांनी केला आहे. या रोड शो मध्ये प्रतिसाद महायुतीच्या बाजूने दिसत आहे. 16 तारखेला विजयाचा गुलाल महायुती उधळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
सोन्याची अंडी म्हणून मुंबईला इतकं वर्ष वापरलं
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर देखील जोरदार टीका केली. सोन्याची अंडी म्हणून मुंबईला इतकं वर्ष वापरलं. आता सोन्याची अंडी खाऊन खाऊन पोट भरलं नाही म्हणून आता कोंबडी कापायला निघाले आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले. महायुती जेव्हा राज्यभर प्रचार करत आहे, तेव्हा महाविकास आघाडी कुठेच दिसत नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पक्षाला सुद्धा वाऱ्यावर सोडलं आहे. महायुतीच्या कामाची पोचपावती जनता 16 तारखेला देणार आहे. महायुतीला दीडशे पेक्षा जास्त जागा मुंबईत मिळतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील
दरम्यान, त्यांना माहित झालं आहे की त्यांची सत्ता येणार नाही. त्यामुळं ते खोटी आश्वासन देत आहेत. लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले त्या विरोधात ते कोर्टात गेले. योजना बंद पाडण्याचं पाप करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता तेच लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत आहेत. लाडक्या बहिणीला त्यांचा विश्वास नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या कामाची पोचपावती जनता 16 तारखेला देणार आहे. महायुतीला दीडशे पेक्षा जास्त जागा येतील असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई मबापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायलामिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पण खरी लढत ही ठाकरे बंधू विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:





















